kirron kher and anupam kher lovestory sakal
मनोरंजन

लग्नाआधी दोघांचेही होते संसार,पण.. किरण अनुपम खेर यांची फिल्मी लव्हस्टोरी

बॉलीवूड अभिनेत्री किरण खेर यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांची ही खास लव्हस्टोरी..

नीलेश अडसूळ

kiron kher : बॉलीवूड अभिनेत्री किरण खेर यांचे नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून आपल्या दमदार अभिनयाची मोहर उमटवली. एवढेच नाही सध्या त्या रिअलिटी शो मध्ये जज म्हणून काम करतानाही त्यांच्या खेळकर आणि काहीशा खोडकर स्वभावाने रसिकांचे मनोरंजन होते. किरण खेर यांचा आज वाढदिवस. त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण किरण खेर यांचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. त्यांचे पती अनुपम खेर (anupam kher) हे बॉलीवूड मधील एक दिग्गज अभिनेते आहेत. अनुपम आणि किरण हे बॉलिवूडमधील आदर्श कपल मानलं जातं. पण त्यांची लव्हस्टोरीही तशीच खास आहे. (kirron kher and anupam kher lovestory) (happy birthyday kirron kher)

अनुपम आणि किरण यांच्यामध्ये सुरुवातीला चांगली मैत्री होती. या दोघांच्या नात्यामध्ये मैत्रीशिवाय कधीच प्रेम भावना नव्हती. यादरम्यान दोघांनी दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न केलं अन् संसार थाटला. पण काही काळ लोटल्यानंतर आपलं एकमेकांवर प्रेम असल्याची जाणीव अनुपम आणि किरण यांना झाली. किरण खेर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हणल्या होत्या, ‘अनुपम त्यांच्या लग्नानंतर काही काळातच पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले. तर मलाही आणि माझ्या पहिल्या पतीला हे समजलं होतं की आता आपलं नातं फार काळ टिकू शकत नाही. याच प्रसंगादरम्यान मी आणि अनुपम एका नाटकासाठी पुन्हा एकत्र आलो. आणि तिथेच आमच्या नात्याला सुरवात झाली,'

असं म्हणतात, 'या नाटका दरम्यान एकत्र काम करत असताना अनुपम आणि किरण यांच्यातील जवळीक वाढली. ते एकमेकांकडे एकमेकांकडे आकर्षित झाले. याचवेळी किरणवर आपलं आहे यांची जाणीव अनुपम यांना झाली आणि त्यांनी ते व्यक्त केलं. पुढे किरण यांनीही आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि काही काळातच किरण या किरण अनुपम खेर झाल्या. आज पर्यंत या दोघांमधील प्रेम आणि बॉण्डिंग कमी झालेलं नाही. किंबहुना आदर्श जोडप्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT