kirron kher and anupam kher lovestory They Left Their Partners To Give Love A Second Chance sakal
मनोरंजन

Kirron Kher HBD: नव्या प्रेमाची जाणीव झाली, आणि किरण खेर यांनी पहिल्या नवऱ्याला दिला घटस्फोट.. खास किस्सा!

आज किरण खेर यांचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने पाहूया किरण आणि अनुपम यांची हटके लव्हस्टोरी

नीलेश अडसूळ

Kirron kher Birthday : बॉलीवूड अभिनेत्री किरण खेर यांचे नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून आपल्या दमदार अभिनयाची मोहर उमटवली.

एवढेच नाही सध्या त्या रिअलिटी शो मध्ये जज म्हणून काम करतानाही त्यांच्या खेळकर आणि काहीशा खोडकर स्वभावाने रसिकांचे मनोरंजन होते. किरण खेर यांचा आज वाढदिवस. त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पण किरण खेर यांचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. त्यांचे पती अनुपम खेर हे बॉलीवूड मधील एक दिग्गज अभिनेते आहेत. अनुपम आणि किरण हे बॉलिवूडमधील आदर्श कपल मानलं जातं. पण त्यांची लव्हस्टोरीही तशीच फिल्मी आहे.

(kirron kher birthday) (happy birthyday kirron kher)

अनुपम आणि किरण यांच्यामध्ये सुरुवातीला चांगली मैत्री होती. या दोघांच्या नात्यामध्ये मैत्रीशिवाय कधीच प्रेम भावना नव्हती. यादरम्यान दोघांनी दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न केलं अन् संसार थाटला.

पण काही काळ लोटल्यानंतर आपलं एकमेकांवर प्रेम असल्याची जाणीव अनुपम आणि किरण यांना झाली. किरण खेर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हणल्या होत्या, 'अनुपम त्यांच्या लग्नानंतर काही काळातच पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले.'

'आणि मलाही आणि माझ्या पहिल्या पतीला हे समजलं होतं की आता आपलं नातं फार काळ टिकू शकत नाही. याच प्रसंगादरम्यान मी आणि अनुपम एका नाटकासाठी पुन्हा एकत्र आलो. आणि तिथेच आमच्या नात्याला सुरवात झाली.'

(kirron kher and anupam kher lovestory They Left Their Partners To Give Love A Second Chance)

असं म्हणतात, 'या नाटका दरम्यान एकत्र काम करत असताना अनुपम (anupam kher) आणि किरण यांच्यातील जवळीक वाढली. ते एकमेकांकडे एकमेकांकडे आकर्षित झाले. याचवेळी किरणवर आपलं आहे यांची जाणीव अनुपम यांना झाली आणि त्यांनी ते व्यक्त केलं.'

'पुढे किरण यांनीही आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि काही काळातच किरण या किरण अनुपम खेर झाल्या. आज पर्यंत या दोघांमधील प्रेम आणि बॉण्डिंग कमी झालेलं नाही. किंबहुना आदर्श जोडप्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCB Action: खोटी माहिती देणं पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला पडलं महाग; PCB ने ठोठावली दोन वर्षांची बंदी

Dr. Amol Kolhe : 'डॉ. काकोडकर समितीचे स्वागत पण झारीतील शुक्राचार्य कोण?'

Umrakhed News : कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने अल्पभूधारक शेतकर्‍याने संपविले जीवन

Rahul Gandhi Video: कारच्या 'फ्यूल टँक'ची कॅप उघडली अन् सरकारवर बरसले! राहुल गांधींचा E20 वर व्हिडीओ

अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रूममध्ये... बॉलिवूड हिरोच्या पत्नीने मागे लावली डिटेक्टिव्ह; झाले धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT