मनोरंजन

किर्ती कुल्हारी म्हणते, 'मी संसार टिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण..'

शरयू काकडे

'उरी -द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री किर्ती कुल्हारीने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. किर्तीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. (Kirti Kulhari Gives statement about separation in marriage)

''मी माझा संसार टिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि हे प्रयत्न मला कोणी सांगितले म्हणून नाही तर मला वाटलं म्हणून मी केले आहे. आमचं नातं टिकविण्यासाठी शक्य तितके सगळे प्रयत्न केल्यानंतर मला समजले की आता आणखी प्रयत्न करु शकत नाही. तेव्हा मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. माझ्या आई वडिलांनी मला पाठिंबा दिला आहे.'' अशी प्रतिक्रिया किर्तीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.

''मी आणि साहिल आम्ही एकमेकांवर प्रेम केलं. त्यानंतर आयुष्य शेअर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. या लग्नात मी खूप काही शिकले. आज मी माझ्या वैयक्तित आयुष्याच्या आणि करिअरच्या ज्या टप्प्यावर आहे, त्यात साहिलचा खूप मोठा वाटा आहे. मी आणि साहिल विभक्त होण्याच्या कारणांबाबत काहीही सांगणार नाही पण, शेवटी इतकंच सांगेन की, मला या नात्यातून आनंद, शांती मिळत नाही म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी आनंद, शांती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मग मी विवाहित असो वा नसो, काम करत असो वा नसो. मला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. आमच्या संसारात मला ती शांती मिळत नव्हती. माझ्या निर्णयामागे हे साधं आणि सोपं कारण आहे.'' असे किर्तीने स्पष्ट केले.

विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत बोलताना किर्ती म्हणाली की, ''तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत आनंदी नसाल, तुमच्या शांती मिळत नसेल तर तुम्हाला तुमचा निर्णय घ्यावा लागतो आणि मी माझा निर्णय घेतला आहे. मला माझ्या निर्णायावर विश्वास असेल तर मग इतरांना काय वाटतं याने काहीही फरक पडत नाही. मग ते माझे पालक का असेनात. समाज, कुटुंब, आई वडील यांना वाटतंय म्हणून लग्नात अडकून राहू नये, तुम्हाला काय हवंय हे तुम्हाला समजले पाहिजे मग तो निर्णय घेताना तुम्ही एकटे असाल तरी तो निर्णय घेता आला पाहिजे. मीही तेच केलंय.'''

काय आहे किर्तीची पोस्ट?

'मी सर्वांना सांगू इच्छिते की पती साहिल आणि मी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. कागदावर नाही तर खऱ्या आयुष्यात आम्ही विभक्त होत आहोत. एखाद्यासोबत असण्यापेक्षा एखाद्यापासून वेगळं होण्याचा निर्णय कठीण असतो. कारण एकत्र येण्याचा आनंद सर्वजण मिळून साजरा करतात. विभक्त होण्याचा निर्णय अत्यंत त्रासदायक आणि दु:खदायक आहे. हे अजिबात सोपं नाही आणि कदाचित ते कधीच सोपं नसतं. पण आता जे आहे ते आहे. ज्यांना माझी काळजी आहे, त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की मी ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असाल अशी अपेक्षा करते. यापुढे मी या विषयावर काहीच बोलणार नाही', अशी पोस्ट किर्तीने लिहिली.

पिंक' या चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर किर्ती प्रकाशझोतात आली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तीन-चार महिन्यांपूर्वी किर्तीने साहिलशी लग्नगाठ बांधली. किर्ती तिच्या खासगी आयुष्यावर फार कधी व्यक्त होताना दिसत नाही. त्यामुळे तिच्या लग्नाविषयी फारशी कोणाला माहिती नव्हती. 'पिंक'नंतर किर्तीने 'उरी' आणि 'मिशन मंगल' या चित्रपटांमध्ये काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

CJI BR Gavai यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात १० दलित न्यायाधीशांची नियुक्ती, ओबीसी कीती?

Pune Municipal Corporation Election : नऊ प्रभागांमध्ये महिला राज; निवडणुकीत मते ठरणार निर्णायक, पुण्यात ८३ महिला नगरसेवक निवडले जाणार

Jalna News: जालना हादरलं! दुचाकी वादातून तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Dharashiv Accident: धाराशिवमधील अपघातात तिघे ठार; मोटारीचा टायर फुटून अपघात, ११ जण जखमी

SCROLL FOR NEXT