Kishore Kumar's son Amit Kumar opens up on Madhubala Biopic Google
मनोरंजन

मधुबाला यांच्यावर बायोपीक; किशोर कुमारांचे सुपुत्र अमित कुमार स्पष्टच बोलले

मधुबाला यांची बहिण मधुर भूषण या त्यांच्यावर बायोपीक काढत आहेत. याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

प्रणाली मोरे

किशोर कुमार(Kishore Kumar) आणि मधुबाला(Madhubala) यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री जेवढी गाजली तेवढाच त्यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीतही लोकांनी नेहमीच रस घेतलेला दिसून आला. त्यांच्यातील मैत्री,प्रेम,लग्न आणि या संपूर्ण नात्याचा झालेला दुःखद अंत आज आपल्याला अनेक ऐकीव गोष्टीतून माहित आहे. आज पुन्हा ही जोडी चर्चेत आली ते मधुबाला यांच्यावर बायोपीक येत आहे आणि याविषयी किशोर कुमार यांच्या मुलानं म्हणजेच गायक अमित कुमार(Amit Kumar) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली म्हणून.(Kishore Kumar's son Amit Kumar opens up on Madhubala Biopic)

अमित कुमार हे देखील एक गायक आहेत. त्यांनी काही सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत पण आपल्या वडीलां इतकं यश त्यांच्या वाट्याला आलं नाही. ते आज अनेक कार्यक्रमातून परफॉर्म करताना दिसतात. अनेकदा आपले वडील किशोर कुमार यांची उडत्या चालीची गाणी ते गाऊ लागले की चाहत्यांना किशोर दा यांची झलक त्यांच्या हावभावातून अन् आवाजातून दिसून जाते हे देखील तितकच खरं आहे. सध्या ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गाण्याच्या शो च्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहतात.

अमित कुमार यांनी नुकतीच एका इंग्रजी वेबसाईटला दीर्घ मुलाखत दिली. त्यात त्यांना मधुबाला यांच्यावर बायोपीक येत आहे यासंदर्भात प्रश्न विचारला गेल्यावर त्यांनी आपलं मत स्पष्ट मांडलं आहे. अमित कुमार यांना विचारलं गेलं की,' मधुबाला यांची बहिण मधुर भूषण या त्यांच्यावर बायोपीक काढत आहेत. अनेक गोष्टी यानिमित्तानं लोकांसमोर येतील,ज्या कदाचित तुमच्या कुटुंबाशी-वडीलांशी संबंधित असतील यावर तुमचं मत काय आहे,तुमचा विरोध तर नसेल?' त्यावर उत्तर देताना आपलं स्पष्ट मत मांडताना अमित कुमार म्हणाले,''आता अनेक जणांवर बायोपीक येत आहे. त्यामुळे मधुबाला यांच्या बायोपीक का नको? आम्ही देखील आमच्या वडीलांवर बायोपीक काढण्याच्या तयारीत आहोत''. अर्थात यामुळे हे स्पष्ट झालं आहे की मधुबाला यांच्यावर बायोपीक निघाला तर किशोर कुमार यांच्या कुटुंबियांकडून विरोध नसणार.

अमित कुमार हे किशोर कुमार यांची पहिली पत्नी रुमा गुहा ठाकूर यांचे चिरंजीव. रुमा गुहा ठाकूर यांचे निधन २०१९ मध्ये वृद्धापकाळाने झाले. किशोर कुमार यांनी दुसरं लग्न मधुबाला यांच्यासोबत केलं. पण लग्नाच्या काही दिवसांत मधुबाला यांना वयाच्या अवघ्या ३६ वर्षी कॅन्सरनं गाठलं अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अर्थात त्यानंतर किशोर कुमार यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी लग्न केलं पण ते लग्न २ वर्षच टिकलं. त्यानंतर किशोर कुमार यांची चौथी पत्नी बनून लीना चंदावरकर किशोर कुमार यांच्या आयुष्यात आल्या. आज अमित कुमार आणि लीना चंदावरकर यांच्यात खूप चांगलं नातं आहे. अनेक कार्यक्रमातून ते एकत्र देखील हजेरी लावताना दिसतात.

असो,आता चाहत्यांना मात्र उत्सुकता आहे ते आपली लाडकी अभिनेत्रे मधुबाला आणि गायक किशोर कुमार यांच्या बायोपीकची,त्या भूमिका नेमकं कोण साकारणार याविषयीची. अर्थात मधुबाला यांच्या बायोपीकविषयी काही समोर येत नसलं तरी किशोर कुमार यांची व्यक्तिरेखा रणबीर कपूर साकारणार या चर्चेला अमित कुमार यांनी पू्र्ण विराम दिला आहे. त्यामुळे आता दुसरा कोणता अभिनेता त्याजागी असणार याविषयी चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT