Kishori Shahane dance VIDEO VIRAL Marathi song Mast challay amcha 
मनोरंजन

''मस्त चाललंय आमचं'', किशोरी शहाणे यांचा डान्स VIDEO VIRAL

शरयू काकडे

सध्या जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. इन्स्टाग्राम, फेसबूकच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी आपल्या सोशल मिडिया अकांऊटवर सतत काहीना काही अपडेट, फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. मराठी चित्रपटश्रृष्टीमध्ये आपल्याला अभिनय, सौंदर्य आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे. मराठीसह हिंदीमध्ये कित्येक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. किशोरी शहाणे या सोशल मिडियावर अॅक्टिव्ह आहेत. (Kishori Shahane dance VIDEO VIRAL Marathi song Mast challay amcha)

स्टार प्लसवरील ‘गुम है किसे के प्यार मैं’ (Ghum Hai Kisi Ke Pyar Mai) या मालिकेत काम करत आहेत. मालिकेतील कलकारांसोबत मौज-मजा, डान्स करतानाचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर पोस्ट करत असतात. असाच आपल्या सहकलाकरासह किशोरी शहाणे यांनी नऊवारी नेसून मराठी गीतावर डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या डान्सला चाहत्यांनी पसंती दर्शवली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

किशोरी शहाणे या उत्तम अभिनयासह उत्तम नृत्य देखील करतात. कित्येक मराठी चित्रपटामंध्ये, डान्स शोज मध्ये त्यांनी लावणी नृत्य सादर केली आहे. सध्या सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असून आपल्या डान्सचे व्हिडीओ शेयर करत असतात. काही दिवसांपूर्वीच ‘गोरे गोरे गालों पे काला काला तील’ हा गाण्यावर नऊवारी साडी नेसून थिरकतानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आत्ता 'आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं' या मराठी गीतावर ठुमके लगावतानाच हा डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. या व्हिडिओ किशोरी शहाणे यांच्यासोबत 'गुम है किसे के प्यार मैं’ मालिकेतील सह कलाकार अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा हिच्या सोबत डान्स केला आहे. किशोरी शहाणे यांच्या वय 50च्या पुढे असून वयातसुद्धा उत्तम नृत्य करताना पाहून चाहत्यांना त्यांचे कौतुक वाटत आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी मराठीतील प्रसिद्ध कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत काम केलं आहे. मराठीतील त्यांचे अनेक चित्रपच गाजले आहेत. तसचे त्यांनी काही हिंदी चित्रपटही केले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या किशोरी शहाणेंनी 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावली होती. 'गुम है किसे के प्यार मैं’ मालिकेतील चव्हाण कुटुंबातील प्रमुख भवानी चव्हाणच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या भूमिकेला जरी नकारात्मक छटा असली तरी एकंतर त्यांचं अभिनय प्रेक्षकांना चांगलंय भावलंय. मालिकेतील त्यांचा 'मस्त हा मस्त' हा संवादसुद्धा चांगलाच गाजला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माऊंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमसचा जल्लोष, प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी वांद्र्यात गर्दी

SCROLL FOR NEXT