Kishwer Merchant  Instagram
मनोरंजन

अभिनेत्रीच्या चार महिन्यांच्या मुलाला कोरोना; सांगितला हृदयद्रावक अनुभव

सोशल मीडियावर लिहिली पोस्ट

स्वाती वेमूल

काही दिवसांपूर्वीच टीव्ही अभिनेता नकुल मेहताच्या ११ महिन्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. नकुलची पत्नी जानकी पारेखनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली होती. आता अभिनेत्री किश्वर मर्चंटच्या (Kishwer Merchant) मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. किश्वरचा मुलगा निर्वैर (Nirvair) अवघ्या चार महिन्यांचा आहे. पती सुयश रायने तिची आणि मुलाची काळजी कशाप्रकारे घेतली, याबद्दल किश्वरने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली आहे.

किश्वरने ९ जानेवारी २०२२ रोजी इंस्टाग्रामवर सुयशसाठी एक पोस्ट लिहिली. कठीण काळात पतीने कशा पद्धतीने साथ दिली, याविषयी तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ती लिहिते, 'मी या व्यक्तीला गेल्या ११ वर्षांपासून ओळखतेय आणि तो खूप बदलला आहे. तो खूपच समजूतदार, जबाबदार आणि प्रेमळ झाला आहे. पाच दिवसांपूर्वी निर्वैरला सांभाळणाऱ्या आयाला कोरोना झाला होता आणि त्यानंतर जे घडलं ते एका आपत्तीपेक्षा कमी नव्हतं. घरकाम करणाऱ्या महिलेलाही कोरोनाची लागण झाली आणि तिला क्वारंटाईन करण्यात आलं. त्यानंतर आमच्यासोबत राहणारा सुयशचा मित्र सिड यालाही कोरोनाचा संसर्ग झाला. माझ्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आणि घरात आम्हा दोघांशिवाय कोणीच जेवण बनवणारं किंवा साफसफाई करणारं नव्हतं. या वाईट काळात सुयशने माझी खूप मदत केली. मुलासोबतच त्याने घरकाम करणारी महिला आणि त्याच्या मित्राचीही काळजी घेतली.'

कोरोनानं जे दिवस आम्हाला दाखवले त्यातून बाहेर येणं अजूनही कठीण जातंय, अशा शब्दांत किश्वरने भावना व्यक्त केल्या. तिच्या या पोस्टवर टीव्ही इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.

देशातील कोरोनाच्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटमध्ये वाढ होत चालली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून रविवारी दिवसभरात १ लाख ७९ हजार ७२३ कोरोनाचे रुग्ण आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT