Salman Khan Movie  viral
मनोरंजन

Salman Khan Movie : पठाणनंतर प्रतिक्षा 'किसी का भाई किसी की जान'ची! पठाणचं रेकॉर्ड मोडणार?

बॉलीवूडच्या किंग खानचा शाहरुखचा पठाण प्रदर्शित झाल्यानंतर बॉलीवूडच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला होता. त्यामध्ये शाहरुखनं कोट्यवधीची कमाई केल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan Movie : बॉलीवूडच्या किंग खानचा शाहरुखचा पठाण प्रदर्शित झाल्यानंतर बॉलीवूडच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला होता. त्यामध्ये शाहरुखनं कोट्यवधीची कमाई केल्याचे दिसून आले आहे. पठाणनं तब्बल सहाशे कोटींची कमाई केली असून चीनमध्ये देखील आमिर खानच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्यात पठाणला यश आले आहे.

यासगळ्यात बॉलीवूडच्या भाईजानच्या किसी का भाई किसी का जान या चित्रपटाचे त्याच्या लाखो चाहत्यांना वेध लागले आहेत. त्यामध्ये सलमान खान आपला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तो चित्रपट कधी प्रदर्शित करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अलीकडेच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा टिझर प्रदर्शित झाला. या टिझरला दर्शकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Also Read - वेळ सिमेंट आणि बँकांच्या शेअरमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्याची

सलमान खानने आपल्या सोशल मीडियावर नवीन लूक शेअर करत आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'चे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. अशातच, या घोषणेमुळे सिनेप्रेमींमध्ये उत्साहाची लहर आली असून, सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, सलमानच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, फोटोमधील त्याचा लूक लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित बहुतांश माहिती सोशलाईज केली नसून फक्त काही लूक्स आणि टीझर रिलीज केला आहे. सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली आहे. त्याचे फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT