Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Esakal
मनोरंजन

Kisi Ka Bhai kisi ki Jaan सिनेमा कुटुंबासोबत पहाल तर बिघडेल पूर्ण महिन्याचं बजेट.. एका तिकीटाची किंमत ऐकाल तर..

'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या तिकीटाचा उल्लेख करताना प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वासवानीनं तो ओटीटी वर पाहण्याचा सल्ला प्रेक्षकांना दिला आहे.

प्रणाली मोरे

Kisi Ka Bhai kisi ki Jaan सिनेमा ईद निमित्तानं रिलीज होणार आहे. या सिनेमात सलमान खान,पूजा हेगडे,जगपति बाबू,भूमिका चावला,विजेंदर सिंग,अभिमन्यु सिंह,राघव जुयाल,सिद्धार्थ निगम,जस्सी गिल,शहनाझ गिल,पलक तिवारी आणि विनाली भटनागर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

सलमान खानचे चाहते त्यांच्या या सिनेमाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. सलमानच्या चाहत्यांनी 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या फर्स्ट जे फर्स्ट शो चं तिकीटही बूक केलं आहे. यादरम्यान या सिनेमाच्या तिकीटाच्या किमतीचा खुलासा झाला आहे.(Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan high ticket price first day collection prediction)

प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वासवानी यांनी ट्वीटरवर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या तिकीटाची हैराण करणारी किंमत सांगितली आहे. ते म्हणाले आहेत की, ''सलमान खानच्या या सिनेमाचं एक तिकीट १३२० रुपये इतकं आहे''.

विवेक वासवानी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,''मी ईद आणि भाईचा सिनेमा हे कनेक्शन समजतो. पण एका तिकीटाची किंमत १३२० रुपये हे समजण्या पलिकडं गेलंय माझ्या. मल्टिप्लेक्समध्ये प्रति पॉपकॉर्न ४०० रुपयानं मिळते. मग पहायला गेलं तर ४ लोकांच्या कुटुंबासाठी १० रुपये खर्च येईल हा सिनेमा पहायला गेलं तर. कार पार्किंग आणि अन्य गोष्टींचे खर्च वेगळेच. माझ्यावर विश्वास ठेवा,सिनेमा ओटीटी वर पाहण्यासाठी काही दिवस वाट पहा''.

आता यावरनं एक स्पष्ट होतंय की एका मोठ्या कुटुंबासाठी सलमान खानचा सिनेमा पहायला जाणं म्हणजे मोठा भुर्दंड ठरू शकतो. 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाविषयी ट्रेड एक्सपर्ट अतुल मोहन यांनी म्हटलं आहे की,''सिनेमा चांगली कमाई करेल. पहिल्या दिवशी सिनेमा १५ ते २० करोड कमवेल. त्यानंतर २५ ते ३० करोडची कमाई करु शकतो. सिनेमाला जवळपास ४००० स्क्रीन्सवर रिलीज केलं गेलं आहे, सिनेमा सलमान खानच्या चाहत्यांसाठी पूर्णपणे मसालेदार बनवला आहे. सिनेमातील गाण्यांची,अॅक्शनची चांगलीच चर्चा आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card : रेशनकार्डमधून १.१७ कोटी लोकांची नावे वगळणार, केंद्राने राज्यांना पाठवली यादी; तुमचं नाव तर नाही ना ?

Pune Traffic : सिंहगड रस्तावासीयांना पुन्हा मनस्ताप; पाऊस, प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT