Kisi ka bhai Kisi Ki Jaan Esakal
मनोरंजन

Viral Video:'तेरे नाम' च्या 'राधे' ला रिअल लाईफ मध्येही घाबरायला लागलेली भूमिका चावला..सलमाननं शेअर केला मजेदार किस्सा

'तेरे नाम' सिनेमात निर्झरा आणि राधेची भूमिका साकारणाऱ्या भूमिका चावला आणि सलमानची जोडी त्यावेळी सुपरहिट ठरली होती.

प्रणाली मोरे

Kisi ka bhai Kisi Ki Jaan: भूमिका चावलाला कोण विसरू शकतं? 'तेरे नाम' निर्झराच्या भूमिकेत अभिनेत्रीला खूप पसंत केलं गेलं होतं. 'तेरे नाम' मधील सलमान खान आणि भूमिका चावलाची जोडी सुपरहिट राहिली होती. या सिनेमानंतर भूमिकानं एखाद दुसरा हिंदी सिनेमा केला आणि त्यानंतर ती साऊथ सिनेमांमध्ये काम करू लागली.

पण आता पुन्हा जवळपास २० वर्षानंतर भूमिका चावला पुन्हा एकदा सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमांत काम करताना दिसणार आहे, सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला भूमिका चावला आपल्या या नव्या सिनेमाविषयी खूपच उत्सुक दिसली. यादरम्यान सलमाननं भूमिका चावलासोबत काम करतानाचा एक मजेदार किस्सा शेअर केला.

Salman Khan नं सांगितलं की २० वर्षा आधीची आणि आताच्या भूमिका चावलामध्ये जमिन-आस्मानाचं अंतर आहे. दोघं त्यावेळी सेटवर एकमेकांसोबत कसे वागायचे याविषयी देखील सलमाननं सांगितलं.

पण सलमान आधी भूमिका चावलानं एक गोष्ट शेअर केली. अभिनेत्री म्हणाली,''ज्या पद्धतीनं सलमान प्रत्येक गोष्टीवर रिअॅक्ट करतो,ते तिला खूप आवडतं''.(Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman Khan recalls with working with bhumika chawla)

भूमिका चावलानं सलमानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करत सांगितलं की, ''त्यावेळचा काळही वेगळा होता आणि आमच्या दोघांची आयुष्यही. पण आयुष्य बदलत असतं आणि आपणही मोठे होत असतो.मला तुम्हाला सगळ्यांसोबत ही गोष्ट शेअर करायची आहे की जेव्हा मी 'तेरे नाम' सिनेमाच्या ऑडिओ रिलीजसाठी आले होते तेव्हा मी म्हटलं होतं की,मी सलमान भाईसोबत काम करुन खूप खूश आहे. आणि मी असं बोलल्यामुळे सगळ्यांना शॉक लागला होता की मी नक्की काय बोलतेय''. त्या

नंतर भूमिका पुढे म्हणाली,''आज मी सलमान भाई नाही बोलणार.''

तेव्हा दबंग खाननं विचारलं,''असं काय बदललं?''

तेव्हा भूमिका चावला सलमानची प्रशंसा करत म्हणाली,''मला सलमानसोबत पुन्हा काम करताना खूप मजा आली. आता मला स्वतःसोबतच सलमान मध्ये देखील खूप बदल झाल्याचं दिसून आलं''.

यानंतर सलमान खाननं 'तेरे नाम' च्या शूटिंग सेटवरचा मजेदार किस्सा शेअर केला. सलमान म्हणाला,''तेरे नाम च्या शूट दरम्यान आमच्याच कमालीचं बॉन्डिंग होतं. सिनेमा गंभीर होता पण सेटवर आम्ही खूप दंगा करायचो''.

भूमिका आणि मी एकमेकांशी फक्त इतकंच बोलयचो की,'हाय..कसं सुरू आहे सगळं?',' तू ठीक आहेस?','लंच केलंस?'

मग ती फक्त म्हणायची,'हां सर, नही सर, ओके, पॅकअप झालं की बाय,टेक केअर'.

''पुढील दिवशी पण हेच संवाद रिपीट व्हायचे. आणि 'किसी का भाई किसी की जान' सेटवर देखील हेच व्हायचं. काहीचं बदललं नाही इतक्या वर्षात. मला वाटतं की भूमिकाला वाटलं असावं 'तेरे नाम' मधील राधे सारखा तर मी खऱ्या आयुष्यात नाही ना. तिला वाटलं असावं जास्त बोलले मी तर हा माझ्या मागे पडेल मारण्यासाठी''.

'किसी का भाई किसी की जान' २१ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सलमान आणि भूमिका व्यतिरिक्त सिनेमात पूजा हेगडे,शहनाज गिल, राघव जुयाल,पलक तिवारी,जस्सी गिल,सिद्धार्थ निगम आणि विजेंद्र सिंग काम करताना दिसणार आहेत. यामध्ये व्यंकटेश डग्गूबत्ती,रामचरण आणि जगपति बाबू देखील नजरेस पडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT