Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Esakal
मनोरंजन

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan च्या ट्रेलर लॉंचला सलमानला आली 'या' दोन व्यक्तींची आठवण.. नावं ऐकून बसेल ४४० व्हॉल्टचा झटका

'किसी का भाई किसी की जान' सिनेमाचा ट्रेलर जितका दमदार आहे तितकाच याचा लॉंचिंग सोहळा वेगवेगळ्या कारणांनी गाजला.

प्रणाली मोरे

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खानचे चाहते त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. पण आता ही प्रतिक्षा संपेल...सिनेमाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि सिनेमा २१ एप्रिलला रिलीज केला जाणार आहे. ट्रेलरला प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. सलमाननं सुद्धा आशा व्यक्त केली की सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल.(Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman khan remembered these 2 people at the trailer launch)

एसकेएफ बॅनर अंतर्गत तयार झालेला 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजीनं केलं आहे. सलमान खाननं ट्रेलर लॉंच दरम्यान मीडियाला म्हटलं की सिनेमात अॅक्शन,रोमान्स आणि कौटुंबिक ड्रामा असं सगळं पहायला मिळणार आहे.

अभिनेता म्हणाला,''मला आशा आहे की सिनेमाची प्रशंसा केली जाईल,लोकांना सिनेमा आवडेल आणि लोक थिएटरमध्ये जाऊन पाहतील. हा एक हिंदुस्थानी सिनेमा आहे. यामध्ये अॅक्शन आहे आणि सूरज बडजात्यांच्या सिनेमासारखा कौटुंबिक ड्रामा देखील आहे तर संजय लीला भन्सालीच्या सिनेमांसारखा रोमान्सही आहे. हा आजचा सिनेमा आहे''.

२१ एप्रिल २०२३ ला ईद च्या दिवशी 'किसी का भाई किसी की जान' सिनेमा रिलीज होत आहे. तेलुगु अभिनेता व्यंकटेशची देखील सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जगभरात हा सिनेमा रिलीज करायची जबाबदारी झी स्टुडिओजनं पेलली आहे.

ट्रेलरमध्ये सलमान आपले सिक्स पॅक अॅब्ज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पण कितीतरी नेटकऱ्यांना वाटलं की पोस्टप्रॉडक्श करताना सलमानचे अॅब्ज दाखवायला VFXचा वापर केला आहे.

यावर मौन सोडत भर इव्हेंटमध्ये शर्टाची बटणं खोलून सलमाननं शर्टलेस होत आपले अॅब्ज दाखवले.आणि म्हणाला,''हे दिसतंय ते सगळं तुम्हाला वाटतंय व्हीएफएक्सने झालंय''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT