KL Rahul VS Athiya Wedding Program esakal
मनोरंजन

KL Rahul VS Athiya Wedding Program : के एल राहुल आणि अथियाचा लग्नसोहळा होणार आजपासून सुरू, जाणून घ्या कसे असतील कार्यक्रम

के एल राहुल आणि अथिया 23 जानेवारीला करणार लग्न

सकाळ डिजिटल टीम

KL Rahul VS Athiya Wedding Program : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तो त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. आजपासून (21 जानेवारी) हा विवाह सोहळा सुरू झाला आहे. या तीन दिवसीय सोहळ्यात कॉकटेल पार्टी, मेहंदी आणि हळदीसह अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.

के एल राहुल आणि अथिया 23 जानेवारीला लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. हे लग्न अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्रांमध्येच होणार आहे. अथियाचे वडील बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी आहेत. अथिया आणि के एल राहुलच्या कुटुंबीयांकडून लग्नाची सर्व तयारी करण्यात आली आहे.

राहुल-अथियाचा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे.हा विवाह सोहळा गुप्त ठेवण्यात आला आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्यात हे लग्न होणार आहे. शनिवारपासून विवाहपूर्व कार्यक्रम सुरू होणार आहेत. या दिवशी संध्याकाळी कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी (२२ जानेवारी) मेंहदी आणि हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या दरम्यान कुटुंबातील फक्त जवळचे नातेवाईक सहभागी होणार आहेत. त्यानंतर सोमवार (२३ जानेवारी) हा दिवस केएल राहुल आणि अथियासाठी खूप खास असणार आहे. या दिवशी दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.

लग्नानंतर मुंबई-बेंगळुरूमध्ये दोन मोठे रिसेप्शन होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नानंतर सुनील शेट्टी आणि केएल राहुलचे कुटुंबांनी त्यांच्या उर्वरित मित्र आणि नातेवाईकांसाठी दोन मोठे रिसेप्शन आयोजित केले आहेत,यामध्ये क्रिकेट टीमचे स्टार खेळाडू, बॉलीवूड सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकारणी यांना बोलावण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT