know about sai tamhankars three tattoo meaning, place and for whom  sakal
मनोरंजन

Sai Tamhankar: शरीराच्या 'त्या' भागांवर सईनं गोंदवलेत खास टॅटू! किती आणि कुणासाठी?

सई आणि सईचे टॅटू.. जाणून घ्या खास बात..

सकाळ डिजिटल टीम

Sai Tamhankar tattoo: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. ती तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. तिनं मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहे.

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमी काही ना काही पोस्ट करते. सई कायमच चाहत्यांना मोहित केलेलं आहे. सईच्या . सौंदर्यासोबतच तिचे टॅटू हे कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात.

आज आपण खास तिच्या टॅटूंविषयी जाणून घेणार आहोत. नेमके हे टॅटू किती आणि कुणासाठी आहेत याचा खुलासा सईनंच एका मुलाखतीत केला होता..

(know about sai tamhankars three tattoo meaning, place and for whom )

सईच्या अंगावर एक नाही दोन नाही तर तब्बल तीन टॅटू गोंदवले आहेत. याविषयी एका मुलाखतीत ती म्हणाली होती, 'माझ्या हातावर मी एक चांदणी गोंदवली आहे. हा माझा पहिला टॅटू आहे. मला स्टारचा आकार खूप आवडतो म्हणून मी हा काढून घेतला होता. हा टॅटू काढल्यावर मी स्टार झाले.' असं ती म्हणाली.

पुढे तिनं दुसऱ्या टॅटू विषयी सांगितले. ती म्हणाली, 'माझ्या डाव्या हाताच्या मनगटाच्या खालच्या बाजूला एक टॅटू आहे. त्या टॅटूमधील दोन रेषा आहेत त्या माझ्या आणि गिरीजा ओक हिच्या आहेत. मी आणि गिरीजा खूप जवळच्या मैत्रिणी आहोत.'

'तिच्या आणि माझ्या आयुष्यात जे घडतं त्यात दीड वर्षाचं अंतर असतं. तिने 'तारे जमीन पर' मध्ये आमिर खान सोबत काम केलं त्यानंतर दीड वर्षांनी मी आमिरसोबत काम केलं. गिरीजाचं लग्न झालं आणि त्यानंतर दीड वर्षांनी माझा साखरपुडा झाला.' असं सई म्हणाली.

तर तिसरा टॅटू तिच्या खांद्यावर आहे. रोमन आकड्यात तिनं काहीतरी कोरलं आहे. या बाबत सई (sai tamhankar) म्हणाली होती, ' माझ्या उजव्या खांद्यावर रोमन भाषेत काही अंक कोरले आहेत. ते अंक आहेत २७ \७ \१३. 'हे अंक एका खास व्यक्तीसाठी काढले होते. आमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या तारखा आहेत या. पण आता तो व्यक्तीच माझ्या आयुष्यात नाही.' असा भावनिक प्रसंगही सईनं सांगितला.

माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार सईने हा टॅटू तिचा पती अमेय गोसावी साठी गोंदवला होता. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते त्यांनी लग्न ही केले पण काही वर्षातच ते विभक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT