The Kashmir Files Movie Controversy Sakal
मनोरंजन

The Kashmir Files : चित्रपटावरून रंगलेला वाद नेमका काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विवेक अग्निहोत्रीचा काश्मीर फाईल्स चित्रपट (The Kashmir Files Movie) अल्पावधीतच लोकप्रिय झाला. यामध्ये काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय, तर महाराष्ट्राच्या विधानसभेतही (Maharashtra Assembly) याचे पडसाद उमटले. इतकंच नाहीतर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) देखील या चित्रपटाचा उल्लेख केलाय. पण, या चित्रपटावरून रंगलेला वाद नेमका काय (Kashmir Files Movie Controversy) आहे? ते आपण पाहुयात.

नेमका वाद काय? -

विवेक अग्निहोत्रीच्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं काहींनी कौतुक केलंय, तर काहींनी टीका केला आहे. काहीजण हा चित्रपट पाहायलाच हवा, असा आग्रह सोशल मीडियावरून धरत आहेत. तसेच स्वतः पंतप्रधान मोदींनी देखील हा चित्रपट पाहायला हवा, असं म्हटलं. या चित्रपट धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. हा चित्रपट काल्पनिक आहे. पण, काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचं खरं वर्णन करतोय, असं काही समीक्षकांनी म्हटलंय, तर काहींनी एका धर्माला खलनायक ठरवून ध्रुवीकरण केलं जातंय, असं म्हटलं.

चित्रपटावरून भाजपवर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप -

भाजपकडून या चित्रपटाचं समर्थन केलं जात आहे. अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आपल्या ट्विटरवरून हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली. ''भाजपाला काश्मीर पंडितांबद्दल प्रेम नाही. काश्मिरी पंडितांचं पलायन झालं त्यावेळी भाजप समर्थित व्ही. पी. सिंग सरकार होतं. काश्मीर फाईल्स चित्रपट समाजात दुही निर्माण करण्यासाठी बनवला आहे. यामागे भाजप आणि राजकीय डाव आहे. त्यामुळेच पंतप्रधानांसह सर्वजण या चित्रपटाचा उदोउदो करत आहेत'', असे आरोप सचिन सावंत यांनी केला.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले? -

पंतप्रधान मोदींनी देखील काश्मीर फाईल्स चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. तसेच हा अतिशय चांगला चित्रपट असल्याचं म्हटलं. इतकंच नाहीतर असे चित्रपट व्हायला हवेत, असंही ते म्हणाले. चित्रपटाचं परीक्षण करण्याऐवजी त्याचं श्रेय हिरावून घेण्याची मोहीम चालवली जात आहे. एक गट त्यासाठी काम करत असून हा चित्रपट रोखण्याचं षडयंत्र रचलं जातंय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

'भाजपने काश्मिरी पंडितांसाठी काय केलं?' -

पंतप्रधान मोदी यांनी असे चित्रपट बनवायला पाहिजे असं म्हटलं. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. देशाचे पंतप्रधान धार्मिक ध्रुवीकरण करणारे चित्रपट बनवायला सांगतात, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. तसेच गेल्या ८ वर्षांत भाजपने काश्मिरी पंडितांसाठी काय केलं? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

T20 World Cup: औपचारिकता गांभीर्याने पूर्ण करणार; भारताचा आज नेदरलँड्ससोबत टी-२० विश्वचषकचा अखेरचा साखळी सामना!

SCROLL FOR NEXT