dharmendra
dharmendra 
मनोरंजन

बर्थ डे स्पेशल: मुंबईमध्ये घर नसल्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर आली होती गॅरेजमध्ये झोपण्याची वेळ

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आज त्यांचा ८५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलीवूडचे हिमॅन अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ साली पंजाबच्या नसराली येथे झाला. धर्मेंद्र यांनी त्यांच्या जबरदस्त अभिनयाने आणि हटके अंदाजाने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांच्यासाठी बॉलीवूडचा हा प्रवास काही सोपा नव्हता. 

रिऍलिटी टीव्ही शो 'इंडियन आयडल'च्या ११ व्या सिझनमध्ये जेव्हा धर्मेंद्र गेस्ट म्हणून पोहोचले होते तेव्हा तिथे त्यांनी त्यांच्या संघर्ष काळातील दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितलं की ते जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं. मुंबईमध्ये घर नसल्याकारणाने त्यांना गॅरेजमध्ये झोपावं लागायचं. त्यांनी सांगितलं त्यावेळी माझ्याकडे भले राहण्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता मात्र पैसे कमवण्याची इच्छा आणि धमक नक्कीच होती.धर्मेंद्र यांनी पुढे सांगितलं की, त्यावेळी त्यांनी पार्ट टाईम नोकरी केली जिथे त्यांना २०० रुपये मिळायचे. जेव्हा ते शाळेत शिकत होते तेव्हा शाळेतून येताना ते दररोज एका पुलाजवळ बसून तासनतास त्यांच्या पुढच्या आयुष्याबाबत विचार करत बसायचे.

सध्या धर्मेंद्र पंजाबमध्ये त्यांच्या घरात राहुनंच फार्मिंगचं काम करत आहेत. ते अनेकदा त्यांच्या या फार्म हाऊसवरील भाज्यांचे आणि शेतातील कामांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतात. लॉकडाऊनमध्ये त्यांनी स्वतः भाजी लावण्याची आणि शेतातील इतर कामं केली आहेत. धर्मेंद्र यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी 'अपने' या सिनेमाच्या सिक्लेलची म्हणजेच 'अपने २'ची घोषणा सोशल मिडियाच्या माध्यमातून केली होती.      

know something about dharmendra on his 85th birthday  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT