raghav chadha and parineeti chopra
raghav chadha and parineeti chopra Sakal
मनोरंजन

Raghav Chaddha : शिंदे गटाचे मंत्रीही अभिनेत्रीच्या प्रेमात; 'या' आहेत राजकारण अन् सिनेसृष्टीतल्या जोड्या

सकाळ डिजिटल टीम

राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकारण आणि सिनेसृष्टीतल्या काही जोड्यांवर नजर टाकूयात.

राघव चड्ढा - परिणिती चोप्रा

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते, पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या सध्या चर्चा आहे. हे दोघे मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये दिसले होते. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया, दोघांना शुभेच्छा देणार खासदार संजीव अरोरा यांचं ट्वीट यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं. पण अजूनही दोघांनी याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

धीरज देशमुख - दीपशिखा भगनानी

काँग्रेस नेते, आमदार धीरज देशमुख यांची पत्नीही सिनेसृष्टीशी निगडीत आहे. दीपशिखा भगनानी या चित्रपट निर्मात्या आहेत. धीरज देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि अभिनेता रितेश देशमुखचे भाऊ आहेत.

आयेशा टाकिया - फरहान आझमी

टारझन द वंडर कार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री आयेशा टाकिया. आयेशाने खूप कमी चित्रपटांमध्ये काम केलं. पण तिची लोकप्रियता अजूनही कायम आहे. तिने समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान याच्याशी लग्न केलं. फरहान हे वडिलांसोबत समाजवादी पक्षात काम करत आहेत.

नवनीत राणा - रवी राणा

हे दाम्पत्य सातत्याने चर्चेत असतं. २००९ साली रवी राणा पहिल्यांदा आमदार झाले. त्या वेळी नवनीत राणा या अभिनेत्री, मॉडेल होत्या. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांनी कामही केलं आहेत.

त्यांची रवी राणांशी मैत्री झाली, या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं आणि दोघांनी लग्नही केलं. पुढे नवनीत राणाही आपल्या पतीसोबत राजकारणात सक्रिय झाल्या. आज त्या खासदार आहेत.

उदय सामंत - नीलम शिर्के

शिंदेंच्या शिवसेनेतलं एक प्रमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे उदय सामंत. सामंत सध्या राज्याचे उद्योगमंत्री आहे. त्यांच्या पत्नी मराठीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांना तुम्ही वादळवाट, असंभव, राजा शिवछत्रपती अशा अनेक मालिकांमध्ये तसंच पछाडलेला चित्रपटातही पाहिलं असेल.

त्यांचं नाव आहे नीलम शिर्के. सध्या त्या चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय नाहीत, मात्र त्यांच्या गाजलेल्या भूमिकांमुळे आजही त्यांचे अनेक चाहते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT