Koffe WIth Karan 7 | Ranveer Singh Speaks on His Sex Life Google
मनोरंजन

कॉफी विथ करण 7: रणवीरचा सेक्स लाईफवर मोठा खुलासा, म्हणाला,'व्हॅनिटीतही...'

'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट गेस्ट म्हणून आले होते. हा भाग ७जुलै रोजी प्रसारीत झाला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहर(karan Johar) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आपला फेमस 'कॉफी विथ करण ७' हा नवा सिझन घेऊन भेटीस येत आहे. ७ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉट स्टारवर या शो पहिला एपिसोड स्ट्रिम झाला. ज्यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट गेस्ट म्हणून उपस्थित होते. यावेळी दोघांनी देखील आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. रणवीर (Ranveer)आणि आलियानं आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीविषयी बिनधास्त भाष्य केलं. तर दोघांनीही आपल्या जोडीदारा संदर्भातील काही अशा गोष्टी सांगितल्यात ज्या कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहित नसतील.(Koffe WIth Karan 7- Ranveer singh speaks on his sex life)

करण जोहरने आपल्या शोच्या पहिल्या भागात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट चं ग्रॅंड वेलकम केलं. जवळ-जवळ तीन वर्षानंतर करण पुन्हा एकदा आपला शो घेऊन आला आहे. रणवीर आणि आलिया आल्यानंतर सुरुवातीला करणनं ट्रोलर्सला कडक भाषेत पलटवार केले जे ,करण जोहरला 'गे' म्हणून बोलावतात. रणवीर म्हणाला की त्याला अतरंगी कपडे घातल्यामुळे लोकांच्या खूप विचित्र कमेंट्सला सामोरं जावं लागतं. या भागात रणवीर-आलियानं आपल्याला ट्रोलिंगचा काडीमात्र फरक पडत नाही असं ठणकावून सांगितलं.

रणवीर सिंगनं तर शो मध्ये जे खुलासे केले ते म्हणजे कहरच. त्यानं एका गेम दरम्यानं सांगितलं की लग्नाच्या पहिल्या रात्री त्यानं आणि पत्नी दीपिकानं खूप सेक्सचा आनंद घेतला होता. तेव्हा करण म्हणाला,''अरे लग्नाच्या विधी पार पाडताना थकला नव्हतास?'', तेव्हा रणबीरनं नाही म्हणत मान हलवली. दीपिकासोबत व्हॅनिटी व्हॅनमध्ये देखील आपण सेक्सचा आनंद घेतल्याचं रणबीर म्हणाला. इतकंच नाही,तर त्याच्याकडे सेक्स प्लेलिस्ट आहे. तर आलिया पटकनं म्हणाली पण लग्नाच्या पहिल्या रात्रीत वेगळीच मजा असते.

या भागात रणवीर सिंगने हृतिकपासून कार्तिक पर्यंत सगळ्यांची मिमिक्री केली. पण शेवटी आलिया-रणवीरनं यासाठी सगळ्यांची गोड माफी देखील मागितली. कार्तिक आर्यन करणच्या 'दोस्ताना २' मध्ये काम करणार होता. पण काही खटके उडाल्यानं त्यानं सिनेमा सोडल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या डेडलाइनला पावसाचा फटका! मुंबई-पुणे प्रवासाचा ‘एक्सप्रेस’ स्वप्नाला धक्का; मिसिंग लिंक उशिरा पूर्ण होणार

Rahul Gandhi Reaction : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप ; भाजप सरकावर मोठा आरोप, म्हणाले...

Government Job: महाराष्ट्रात ९३८ सरकारी पदांसाठी भरती; २७ ऑक्टोबरपर्यंतच अर्ज करता येणार, जाणून घ्या प्रक्रिया...

MLA Anna Bansode : माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांना राष्ट्रवादीने भरभरून दिले, त्यांना पूर्ण विचार करण्याचा अधिकार

AIIMS Recruitment 2025: एम्समध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख आणि निवड प्रक्रिया

SCROLL FOR NEXT