Koffee With Karan 7: 'We were in Goa and...'Janhvi Kapoor reveals how she bonded with Sara Ali Khan Instagram
मनोरंजन

Koffee WIth Karan7:'गोव्यात त्या रात्री..', सारा-जान्हवीचा कशाविषयी खुलासा?

सारा-जान्हवीची मैत्री,करियर,पर्सनल लाइफ याविषयीचे अनेक किस्से अभिनेत्रींनी करणच्या शो मध्ये शेअर केले आहेत.

प्रणाली मोरे

सारा अली खान(Sara ali khan) आणि जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) लवकर करण जोहरच्या(Karan Johar) फेमस 'कॉफी विथ करण'च्या(Koffee With Karan) सातव्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या भेटीस येणार आहेत. दोघींसाठीही करणजवळ मजेदार प्रश्नांचे भंडार असेल, ज्यांची उत्तरं जाणून घ्यायला चाहते देखील उत्सुक असणार. सारा-जान्हवीची मैत्री असो,करियर,पर्सनल लाइफ की एक्सचे किस्से. नेहमीप्रमाणेच करण प्रत्येक अॅंगलने या दोन्ही अभिनेत्रींना आपल्या मजेदार प्रश्नांनी बोलायला मजबूर करणार हे ठरलेलं. या शो मध्ये जान्हवी कपूरनं एक मजेदार किस्सा सांगितला आहे. तिची आणि सारा अली खानची मैत्री पहिल्यांदा गोव्यात कशी जुळून आली यावर तिनं भाष्य केलं आहे.(Koffee With Karan 7: 'We were in Goa and...'Janhvi Kapoor reveals how she bonded with Sara Ali Khan)

Janhavi Kapoor And Sara Ali Khan

Koffee With Karan7 मध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट नंतर दुसरी जोडी म्हणून सारा अली खान आणि जान्हवी कपूर येत आहेत. दोघीही स्टार किड्स आहेत आणि बेस्ट फ्रेंड्स देखील,ज्या एकत्र बाहेर फिरायला जायची एकही संधी सोडत नाही. दोघींमधलं बॉन्डिंग सोशल मीडियावर नेहमीच दिसून आलं आहे. जान्हवी कपूरने या दोघींच्या मैत्रीला सुरुवात कशी झाली याचा किस्सा करणच्या शो मध्ये सांगितला.

त्या दोघी कशा सख्ख्या शेजारणीच्या,सख्ख्या मैत्रीणी झाल्या याविषयी जान्हवी कपूरनं सांगितलं आहे. ती म्हणाली,''आम्ही गोव्यात शेजारी म्हणून राहिलो आहोत,तिथे आमचे काही कॉमन फ्रेंड्स होते. मग एके दिवशी आम्ही रात्री गप्पा मारायला सुरुवात केली आणि आम्ही सकाळी ८ वाजेपर्यंत गप्पा मारत होतो''. साराने तिला मध्येच टोकत म्हटलं कसं,''आमच्यात अचानक सुरु झालेल्या गप्पांमध्ये पूर्ण रात्र निघून गेली होती''. सारा आणि जान्हवीने गोव्यामध्ये घालवलेल्या त्या खास क्षणांव्यतिरिक्त आपलं काम,कुटुंब आणि आवडी-निवडींविषयी देखील भरपूर गोष्टी शेअर केल्या आहेत.

सारा आणि जान्हवी दोघींनाही फिरणं अधिक पसंत आहे आणि दोघी अनेक ठिकाणी एकत्र फिरायला देखील गेल्या आहेत. सारा आणि जान्हवीनं आपल्या डिजनीलॅंड ट्रीपचा देखील किस्सा सांगितला. या ट्रीपवर थीमपार्क मध्ये साराच्या मदतीनं कितीतरी वेळा जान्हवी रांग तोडून पुढे गेली आहे. जान्हवी म्हणाली,''मी विचार करायची,ही किती कूल आहे,मला हे कधीच जमलं नसतं. सारामुळे मलापण रांगेत उभं राहून वाट पाहावी नाही लागली. ती आमची बेस्ट ट्रिप होती''.

'कॉफी विथ करण 7' च्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया आणि रणवीर आले होते आणि आता १४ जुलै रोजी म्हणजेच दुसऱ्या एपिसोडमध्ये सारासोबत जान्हवी येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT