Koffee With Karan 8 Alia Bhatt Recalls Breaking Down After Seeing A Picture Of Daughter Raha On Social Media drj96  SAKAL
मनोरंजन

त्या दिवशी मी ढसाढसा रडले आणि रणबीरने मला... आलिया भटचा मोठा खुलासा| Koffee With Karan 8

कॉफी विथ करण 8 मध्ये आलिया भटने हा मोठा खुलासा केला

Devendra Jadhav

Koffee With Karan 8 Alia Bhatt: सध्या कॉफी विथ करण 8 ची चांगलीच चर्चा आहे. या शोच्या नवीन एपिसोडमध्ये आलिया भट - करिना कपूर या दोघींनी हजेरी लावली आहे.

यावेळी आलिया भटने शोमध्ये अनेक खुलासे केले. करण जोहरने आलियाला तिची लेक राहाबद्दल बोलतं केलं. त्यावेळी आलिया भटने सांगितलं की, एक अशी गोष्ट घडली होती की तिला अश्रू अनावर झालेले. काय म्हणाली आलिया? बघा.

KWK शोचा होस्ट करण जोहर म्हणाला, “आलिया राहाबद्दल खुप प्रोटेक्टिव्ह आहे. असं का?" यावर आलियाने उत्तर दिले, “मला आठवते की राहाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला. त्यावेळी मी रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमाचं काश्मीरमध्ये शुटींग करत होते. माझ्यासाठी हे खूप कठीण होतं कारण आई झाल्यानंतर माझं पहिलंच शूटिंग होतं. आई झाल्यानंतर तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता असते.”

आलिया पुढे म्हणाली, “मला राहाला सांभाळणं खुप अवघड जात होतं. मला आठवतंय की रणबीरला फोन केला होता त्याला सांगितलं. त्याने आपले काम पुढे ढकलले आणि तो राहाला न्यायला येईल असं सांगितलं. मला खूप अपराधी वाटले. त्यानंतर मी प्रवासात असताना मला एक फोटो दिसला, त्या फोटोत राहाचा चेहरा दिसत होता. हा फोटो पाहताच मला अश्रू अनावर झाले.”

लोकांना आपल्या मुलीचा चेहरा दिसावा अशी तिची आलियाची इच्छा नव्हती. त्यामुळे फोटो पाहताच तिच्या भावनांचा बांध फुटला आणि तिला रडायला आलं.

कॉफी विथ करण 8 मध्ये आलिया - करिना कपूर सहभागी झाल्या. यावेळी करण जोहरने या दोघींशी बिनधास्त दिलखुलास गप्पा मारुन त्यांना अनेक विषयांवर बोलतं केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT