Koffee With Karan 8 Karthik Aryan right or wrong for 'Aashiqui 3'? Aditya Roy Kapur clearly said SAKAL
मनोरंजन

Koffee With Karan 8: 'आशिकी 3' साठी कार्तिक आर्यन योग्य की अयोग्य? आदित्य रॉय कपूरने स्पष्टच सांगितलं

आशिकी 3 साठी कार्तिक आर्यनची योग्य की अयोग्य? आदित्य रॉय कपूर म्हणाला...

Devendra Jadhav

Koffee With Karan 8 Updates: कॉफी विथ करण 8 हा सध्या चर्चेतला शो. कॉफी विथ करण 8 च्या माध्यमातून करण जोहर शोमध्ये उपस्थित स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारत असतो. कॉफी विथ करण 8 हा सीझनसुद्धा चांगलाच गाजतोय.

आलिया भट - करिना कपूर, रणवीर - दीपिका अशा अनेक कलाकारांनी या सीझनमध्ये हजेरी लावुन त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफसंबंधी अनेक खुलासे केले.

कॉफी विथ करण 8 च्या नवीन एपिसोडमध्ये अर्जुन कपूर - आदित्य रॉय कपूर सहभागी झाले होते. त्यावेळी आदित्य रॉय कपूरने आशिकी 3 संबंधी मोठा खुलासा केला. बघा काय म्हणाला आदित्य.

कॉफी विथ करण 8 मध्ये आदित्य रॉय कपूरचा मोठा खुलासा

कॉफी विथ करण 8 मध्ये करण जोहरने 'आशिकी 2' स्टार अर्थात अभिनेता आदित्य रॉय कपूरला विचारले की, जेव्हा कोणीतरी त्याने साकारलेली भूमिका पुढे साकारतो तेव्हा त्याला कसे वाटते?

ज्यावर आदित्यने प्रतिक्रिया दिली की," आशिकी 3 मध्ये मला असण्याची काही आवश्यकता वाटत नाही. कारण आशिकीच्या दुसऱ्या भागात मी लांब गेलो असतो जिथुन परत येत नाही. मला वाटतं, कार्तिक आर्यन 'आशिकी 3' मध्ये अभिनय करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे."

यावर अर्जुनने कपूरने गमतीशीर उत्तर दिलं, " आशिकी 2 मध्ये लांब गेलेला आदित्य नंतर 'नाईट मॅनेजर' झाला."

मी मेलोय आता कशाला परत येऊ?: आदित्य रॉय कपूर

पुढे कॉफी विथ करण 8 मध्ये बोलताना आदित्य म्हणाला, “मी आशिकी 3 बद्दल आनंदी आहे. माझं आता निधन झाल्याने मी कशाला परत येईन? झालंच तर.. माझा आत्मा परत येईल.” पुढे करण जोहरने विनोद केला, “आदित्य रॉय कपूरचा आत्मा कार्तिक आर्यनला त्रास देईल,” ज्यावर आदित्यने उत्तर दिले, “हो जर असं झालंच तर मी आशिकी 3 मधला खलनायक असेल.” यावर सर्वजण हसायला लागले.

आशिकी 3 बद्दल थोडंसं...

'आशिकी 3' या चित्रपटाचा तिसरा भाग 'लुडो', 'बर्फी' आणि 'जग्गा जासूस' फेम निर्माता - दिग्दर्शक अनुराग बसू दिग्दर्शित करणार आहेत. 'आशिकी 3' निमित्ताने अनुराग आणि कार्तिकचे पहिले-पहिले ऑन-स्क्रीन सहकार्य आहे. याशिवाय या सिनेमात कार्तिकसोबत सारा अली खान असल्याची चर्चा आहे.

महेश भट्ट दिग्दर्शित 'आशिकी' हा सिनेमा 1990 मध्ये T-Series आणि Vishesh Films द्वारे प्रदर्शित झाला होता. 2013 मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित आणि श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची प्रमुख भुमिका असलेला 'आशिकी 2' प्रचंड गाजला. आता 'आशिकी 3' ची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT