Koffee With Karan 8 Promo Esakal
मनोरंजन

Koffee With Karan 8 Promo: तब्बल 16 वर्षांनंतर राणी अन् काजोल एकत्र! कॉफी विथ करणमध्ये आता काय शिजणार?

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण' या शो मुळे चर्चेत आहे.

Vaishali Patil

Koffee With Karan 8 Promo: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या या शोचा 8वा सीझन सुरु आहे. आत्तापर्यंत या शोचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यातच आता करणने या शोच्या पुढील भागाचा प्रोमो सोशल मिडियावर शेयर केला आहे.

करणच्या 'कॉफी विथ करण 8'च्या या भागात बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी या बहिणींची जोडी धमाल करताना दिसणार आहे. 'कॉफी विथ करण 8' च्या पुढच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काजोल आणि राणी या प्रोमोत करणची खिल्ली उडवताना दिसत आहे.

'कॉफी विथ करण सीझन 8' च्या नवीन प्रोमोची सुरुवात राणी मुखर्जीच्या 'मला तुला एक्सपोज करायचे आहे' या वाक्याने होते. तर काजोल म्हणते "मला हा शो आवडत आहे." यावेळी करण अनेक किस्से सांगतो तर काजोल आणि राणी देखील धमाल करताना दिसत आहेत.

काजोल आणि राणी 16 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. राणी आणि काजोलने 1998 मध्ये 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात एकत्र काम केले होते, जो सुपरहिट ठरला होता. यात शाहरुख आणि सलमान खान यांनी देखील काम केले होते.

याआधी दोघी 2007 मध्ये एकत्र शोमध्ये आल्या होत्या. आता चाहते या एपिसोडची वाट पहात आहे. आता हा भाग गुरुवारी ३० नोव्हेंबर Disney+Hotstar वर प्रसारित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT