koffee with karan 8 ranveer singh deepika padukon ranbir kapoor in sangam movie remake karan johar revealed  SAKAL
मनोरंजन

Koffee With Karan 8: रणवीर - दीपिका - रणबीरला घेऊन करण जोहर १९६० च्या 'या' गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक बनवणार

करण जोहरने कॉफी विथ करण 8 मध्ये जाहीर घोषणा केलीय

Devendra Jadhav

Koffee With Karan 8 News: कॉफी विथ करण 8 सध्या चांगलंच चर्चेत आहे. करण जोहर या शोचं सुत्रसंचालन करत आहे. कॉफी विथ करण 8 च्या पहिल्याच एपिसोडला रणवीर - दीपिका पाहुणे म्हणुन आले होते.

रणवीर - दीपिकाने या शोमध्ये अनेक खुलासे केले. याच शोमध्ये करण जोहरने एक महत्वाचा खुलासा केला. रणवीर - दीपिका आणि रणबीर कपुरला घेऊन करण जोहर एका गाजलेल्या हिंदी सिनेमाचा रिमेक करणार आहे. हा सिनेमा नक्की कोणता? जाणुन घेऊ.

(koffee with karan 8 ranveer singh deepika padukon ranbir kapoor in bollywood movie remake karan johar revealed)

१९६४ साली आलेल्या या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक करण जोहर करणार

कॉफी विथ करण 8 मध्ये रणवीरने स्पष्ट सांगितलं की त्याला दीपिकाच्या एक्स - बॉयफ्रेंडसोबत एखाद्या प्रेमकथेत काम करण्यास काहीच अडचण नाही. रणवीरने अर्थात दीपिकाचा एक्स - बॉयफ्रेंड रणबीरचा उल्लेख केला.

रणवीरने हे बोलताच करणने सांगितले की, त्याला रणवीर - दीपिका - रणबीर या तिघांसोबत एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक करायचा आहे. हा सिनेमा म्हणजे संगम. संगम सिनेमात एकाच मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन जिवलग मित्रांभोवती कथा फिरते, असंही करण जोहरने स्पष्ट केलं.

संगम हा चित्रपट 1964 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्र कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट राज कपूर यांनीच दिग्दर्शित केला होता आणि तो ब्लॉकबस्टर ठरला होता.

कॉफी विथ करण 8 च्या रॅपिड फायर राउंड दरम्यान, करण जोहरने रणवीर सिंगला विचारले: "तु आणि दीपिका असलेल्या प्रेम त्रिकोणात, कोणत्या अभिनेत्याला तिसरी भुमिका साकारावी असं तुला वाटतं?"

या प्रश्नावर रणवीरने उत्तर दिले, “रणबीर.”

पुढे रणवीरने करणला त्याच्या जुन्या एका गोष्टीची आठवण करुन दिली. तुला आम्हाला तिघांना घेऊन संगम सिनेमा बनवायचा होता. तु फक्त मोठ्या बढाया मारतो पण प्रत्यक्षात काही करत नाही.

करण जोहरने रणवीरला आश्वासन दिले की, तो संगम सिनेमा अजुनही बनवु शकतो. यावर दीपिकाने सुद्धा उत्सुकता दर्शवली.

अशाप्रकारे येत्या काळात रणवीर - दीपिका - रणबीरला घेऊन करण जोहरने संगमचा रिमेक बनवला तर आश्चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT