Sara Ali Khan  Esakal
मनोरंजन

Sara Ali Khan: शुभमन गिलला डेट करतेय विचारताच सारा खान हसली अन् म्हणाली, "सारा का सारा दुनिया...."

Vaishali Patil

Koffee With Karan 8 Promo: गेल्या काही दिवसापासून करण जोहर त्याचा लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करण मुळे चर्चेत आहे. यंदा कॉफी विथ करणचा 8 वा सीझन आहे. आतापर्यंत या शोचे दोन भाग रिलिज झाले आहेत.

या भागाची सुरुवात दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंहच्या जोडीने झाली. त्यानंतर या शोमध्ये देओल भावंडं आलीत. आता या सिझनचा तीसरा एपिसोड रिलिज होणार आहे ज्यात दोन मैत्रिणीची जोडी पहायला मिळणार आहे. करणच्या शोमध्ये आता येणारी पुढची जोडी आहे सारा अली खान आणि अनन्या पांडेची.

या शो दरम्यान करण जोहर सारा आणि अनन्याला त्यांच्या लव्ह लाईफबद्दल विचारताना दिसला. यावेळी करण आणि साराने अनन्या चिडवले. तर तिनेही तिच्या आणि आदित्यच्या डेटिंगवर चर्चा केली.

निर्मात्यांनी शो चा एक प्रोमो सोशल मिडियावर शेयर केला आहे ज्यात सारा अली खान ही तिच्या आणि शुभमन गिलच्या डेटिंग अफवांवर स्पष्टपणे बोलताना दिसली. मात्र यावेळी तिने एक मोठी हिंटही दिली.

करण जोहरने देखील त्याच्या इंस्टाग्रामवर शोचा नवीनतम प्रोमो पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो सारा अली खान आणि अनन्या पांडेसोबत बोलताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये करण साराला विचारतो की, तुझ्या आणि शुभमन गिलच्या डेटिंगबद्दल खूप अफवा पसरत आहे यावर उत्तर देताना सारा अली खान हसते आणि म्हणते, " सारा का सारा दुनिया गलत सारा के पीछे पडा है". त्यानंतर सर्वच हसतात.

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा अली खान यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र त्यावेळीही साराने या अफवा खोट्या असल्याच्या सांगितल्या होत्या.

मात्र त्यानंतर शुभमन गीलचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले होते. सारा तेंडुलकर आणि शुभमनला अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटोही खुप व्हायरल झाले होते.

त्यातच अलीकडेच सारा तेंडुलकर एका मॅचमध्ये शुभमन गिलला चिअर करण्यासाठी आली होती. त्यावेळी गीलच्या अर्धशतकावर साराने स्टँडिंग ओव्हेशन दिले. त्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या अफवांना पुन्हा हवा मिळाली.

आता त्यातच करण जोहरच्या शोमध्ये सारा अली खानने सर्व लोक चुकीच्या सारा मागे धावत असल्याचं सांगितलं. आता यामुळे साराच्या या वक्तव्यानंतर शुभमन सारा अली खानला नाही तर सारा तेंडुलकरला डेट करत असल्याची हिंट सारा अली खानने दिल्याचे बोलले जात आहे.

तर सारा अली खान बद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही दिवासांपासून तिच्या आणि कार्तिक आर्यनच्या डेटिंगच्या अफवा पसरत आहे. मात्र सारानं यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT