Koffee with Karan: Gauri Khan finally BREAKS SILENCE on Aryan Khan case to Karan Johar  Google
मनोरंजन

Koffee With Karan7: गौरी खानची एन्ट्री, आर्यनच्या ड्रग्ज केसवर सोडणार मौन!

करण जोहरच्या प्रसिद्ध koffee with karan 7 ला 7 जुलै,2022 पासून सुरुवात झाली आहे.

प्रणाली मोरे

करण जोहरने(Karan Johar) 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सिझनला दणक्यात सुरुवात केली आहे. शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला आहे,ते या शो ला सर्वात जास्त व्ह्यूज मिळाल्यानंतर समोर आलं. त्यातच या शो चा टॉप लिस्टमध्ये देखील समावेश करण्यात आला आहे. १८ वर्षापासून 'कॉफी विथ करण' या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत बॉलीवूड सेलिब्रिटींचे अनेक हॉट गॉसिप्स पोहोचले आहेत हे वेगळं सांगायला नको. या शोच्या सातव्या सिझनच्या एका एपिसोडमध्ये करण जोहरच्या बेस्ट फ्रेंड्सच्या लिस्ट मध्ये असलेली शाहरुखची पत्नी गौरी खान आणि तिच्या सोबत भावना पांडे आणि माहीप कपूर हजेरी लावणार आहेत. बोललं जात आहे की गौरी खान या शो मध्ये मुलगा आर्यन खानच्या(Aryan Khan) ड्रग्ज केस(Drugs Case) प्रकरणावर बोलू शकते.(Koffee with Karan: Gauri Khan finally BREAKS SILENCE on Aryan Khan case to Karan Johar)

करण जोहरचं गौरी खान,भावना पांडे,माहीप कपूर यांच्यासोबतचं बॉन्डिंग कसं आहे हे आपल्यापासून लपून राहिलेलं नाही. गौरीला करण आपली मोठी बहिण समजतो. करण आणि शाहरुखची मैत्री देखील खूप खास आहे हे देखील जगजाहीर आहे. स्वतः करणनं अनेकदा सर्वांसमोर हे बोलून दाखवलं आहे. त्यामुळे गौरी खान आपल्यावर आलेल्या त्या संकटाविषयी करणच्या शो मध्ये बोलली तर काही सरप्राइज आहे असं म्हणता येणार नाही. आर्यन खान केस प्रकरणानंतर गौरी मीडियापासून लांब राहणच पसंत करते. पण करणच्या शो च्या माध्यमातून ती आर्यन खान ड्रग्ज केसवर काहीतरी बोलेल अशी आशा चाहते देखील करतच असणार.

आर्यन खान संदर्भात बोलायचं झालं तर सध्या त्या ड्रग्ज केस प्रकरणात एनसीबीनं क्लीन चीट दिली आहे. त्यानंतर आर्यनने कोर्टात आपला पासपोर्ट एनसीबीनं परत द्यावा अशी याचिका दाखल केली होती. यावर बुधवारी,१३ जुलै रोजी सुनावणी झाली. न्यायाधीश वी.वी.पाटील यांनी अद्याप या याचिके संदर्भातला आपला निर्णय सांगितलेला नाही.

'कॉफी विथ करण'च्या शो मध्ये याआधी खुप खुलासे झाले होते. करणचा हा शो गॉसिप आणि सेलिब्रिटींच्या इनसाइड स्टोरीज बाहेर आणण्याचं महत्त्वाचं माध्यम समजला जातो. या शो च्या नवीन सिझनमध्ये अनेक बडे सेलिब्रिटी सामिल झाले आहेत. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी पहिला एपिसोड गाजवला तर , जान्हवी कपूर आणि सारा अली खान दुसऱ्या एपिसोडच्या प्रोमोतून अनेक खुलासे करताना दिसत आहे. हा दुसरा एपिसोड देखील लवकरच स्ट्रीम केला जाईल. यावेळी साऊथ स्टार्सचा देखील भरणा असणार आहे या शो मध्ये. त्यात विजय देवराकोंडा,समंथा रुथ प्रभू,रश्मिका मंदाना यांची नावे आघाडीवर आहेत. गेल्या सिझन मध्ये धनुषनं देखील हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT