Koffee With Karan7- Samantha Ruth Prabhu on her Divorce with Naga Chaitanya
Koffee With Karan7- Samantha Ruth Prabhu on her Divorce with Naga Chaitanya Instagram
मनोरंजन

Koffee With Karan7: घटस्फोटाचा निर्णय पहिला कोणी घेतला?समंथा स्पष्टच बोलली

प्रणाली मोरे

(Koffee With Karan7) 'कॉफी विथ करण ७' मध्ये समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) येणार अशी चर्चा सुरू झाली होती,तेव्हापासूनच तिचे चाहते या एपिसोडची मनापासून वाट पाहताना दिसले. आणि या एपिसोडची उत्सुकता अधिक वाढली जेव्हा याचा प्रोमो रिलीज झाला. यामध्ये समंथा रुथ प्रभु अक्षय कुमार(Akshay Kumar) सोबत एन्ट्री घेताना दिसली. २१ जुलै रोजी रिलीज झालेल्या या एपिसोडमध्ये समंथाने पती नागाचैतन्य(Naga Chaitanya) सोबतच्या घटस्फोटापासून ते आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर नेहमीच आपलं म्हणणं समंथा स्पष्टपणे मांडताना दिसते. करणच्या शो मध्ये तर तिने आपल्या आयुष्यातील चाहत्यांना माहित नसलेल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. आणि मध्ये-मध्ये करण जोहरची देखील तिनं मजा-मस्करी करत खिल्ली उडवली आहे.(Koffee With Karan7- Samantha Ruth Prabhu on her Divorce with Naga Chaitanya)

करण जोहरने समंथा रुथ प्रभुला म्हटलं की तिच्या घटस्फोटाविषयी, तुटलेल्या लग्नाविषयी तो तिला काहीच प्रश्न विचारणार नाही. शिवाय नागाचैतन्य आणि तिच्यात नेमकं काय घडलं की त्यांनी घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेतला याविषयी देखील तो विचारणार नाही. पण लगेच पुढच्या क्षणी करण तिला म्हणाला की,''तू अजूनही नागा चैतन्य सोबत मैत्री कायम ठेवून आहेस?'' तेव्हा लगेचच समंथाने करणची मस्करी करत म्हटलं ,''आता दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पडायचं नाही ही तुझी पॉलिसी कुठे गेली?'' यावर करणची बोलतीच बंद झाली.

करणनं समंथासोबत तिच्या घटस्फोटाविषयी बोलताना म्हटलं की,''तुझ्याविषयी मला असं वाटतंय की तुच तुझा पती नागाचैतन्यपासून वेगळा होण्याचा पहिला निर्णय घेतला असशील?'' यावर समंथा लगेच करणला मध्येच टोकते आणि त्याच्या वाक्यात दुरुस्ती करत म्हणते ,''पती नाही,एक्स पती''. करण जोहर मग समंथाला विचारतो की,'' नागा चैतन्यसाठी तुझ्या मनात हार्ड फीलिंग्ज आहेत का?'' यावर काय म्हणाली आहे समंथा रुथ प्रभू?

समंथा चक्क यावर 'हो' म्हणाली आहे. ती म्हणाली,''सध्या आम्हाला एकमेकांसाठी हार्ड फीलिंग्ज आहेत. त्या इतक्या की जर आम्हाला एका खोलीत बंद केलं तर आमच्यापासून तुम्हाला धारदार वस्तू लपवून ठेवाव्या लागतील. सध्या वातावरण तंग आहे. पण कदाचित भविष्यात परिस्थिती बदलू शकते,आशा ठेवूया''.

Samantha Ruth Prabhu With Ex-Husband Naga chaitanya (Weeding Photo)

समंथा रुथ प्रभुने नागा चैतन्यला काही दिवस डेट केल्यानंतर २०१७ मध्ये त्याच्यासोबत लग्न केलं होतं. २ ऑक्टोबर,२०२१ ला त्या दोघांमध्ये घटस्फोट झाला. समंथाने सोशल मीडियावर या घटस्फोटाविषयी माहिती दिली होती. त्यावेळी समंथाला अनेकांनी ट्रोल केलं होतं. तिला खूप सुनावलं देखील होतं.

करण जोहरने(Karan Johar) जेव्हा समंथाला विचारलं की,जेव्हा ती नागाचैतन्यपासून विभक्त झाली तेव्हा तिला ट्रोलिंगची भीती वाटत होती का? तेव्हा समंथा म्हणाली,''माझ्या आयुष्यात काय चाललंय हे माझ्या चाहत्यांना सांगावं हा माझा निर्णय होता. त्यामुळे त्यांनी मला ट्रोल केलं,खूप बोलले याची मी तक्रार करणार नाही. कारण मला सगळं ट्रान्स्परंट ठेवायचं होतं, तो माझाच निर्णय होता. त्यामुळे नागा चैतन्यपासून मी वेगळी झाले तेव्हा मला कोण काय बोललं याची मी तक्रार करणार नाही. याचं मला दुःख देखील नाही. आणि हे फक्त एवढ्यासाठी की माझ्या चाहत्यांनी,प्रेक्षकांनी मला नेहमीच प्रेम दिलंय,माझ्या यशात त्यांचाही वाटा आहे, सो मला सुनावणं हा त्यांचा हक्क आहे''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT