मनोरंजन

Rachel Shelley: लगानमधील एलिजाबेथ तब्बल 22 वर्षांनी करणार कमबॅक! 'या' सिरिजमध्ये झळकणार..

Vaishali Patil

Rachel Shelley On Kohrra: दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा 'लगान' हा चित्रपट 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षे झाली आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे झेंडे रोवले. इतकच नाही तर 'लगान'ला ऑक्सरमध्ये देखील पाठवण्यात आला. या चित्रपटात सुपरस्टार आमिर खान मुख्य भूमिकेत होता.

आमिर खानच्या 'लगान' चित्रपटात ब्रिटीश अभिनेत्री रॅचेल हिने देखील चित्रपटात महत्वाची भुमिका केली होती. तिने या चित्रपटात एलिझाबेथची भूमिका साकारणारी होती. तब्बल 22 वर्षांनंतर ती पुन्हा कमबॅक करत आहे. ब्रिटीश अभिनेत्री रचेल शेली लवकरच नेटफ्लिक्सच्या कोहरा या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शक रणदीप झा यांनी केले आहेत.

'कोहरा' या सिरिजची निर्मात्यांनी त्याचा ट्रेलरही रिलीज केला आहे. सत्याचा शोध आणि राजकारणाशी निगडीत या कथेचा टिझर प्रेक्षकांना आवडला आहे. या मालिकेत बरुण सोबती, सुविंदर विकी, वरुण बडोला, हरलीन सेठी हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत. कोहरा इन्वेस्टिगेशन ड्रामा आहे. या मालिकेची निर्मिती पाताल लोक फेम सुदीप शर्मा आणि लेखक गुंजीत चोप्रा आणि दिग्गी सिसोदिया यांनी केली आहे.

सुदीप म्हणाला की, रचेल शेली ने लगानमध्ये काम केल्यामुळे त्याने रचेल शेलीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला. ती खूप चांगली अभिनेत्री आहे आणि मी तिचे चित्रपटही पाहिले आहेत. तिला कास्ट करण्याचा निर्णय काहीसा भावनेच्या आधारे घेण्यात आला.

तसेच, कोहराच्या कास्टिंग डायरेक्टर निकिता ग्रोव्हरने या मालिकेसाठी योग्य कलाकार शोधण्यासाठी पंजाबमध्ये जवळपास तीन महिने घालवले आणि तिने उत्तम काम केले आहे. सुदीपने सांगितले की निकिता ग्रोवरने पाताल लोकमध्येही कास्टिंग केले होते.

दरम्यान 22 वर्षानंतर आता पुन्हा रचेल शेलीला कमबॅक करणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत. ही सिरिज 15 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या मालिकेची निर्मिती क्लीन स्लेट फिल्म्सने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT