Lalitha Actress 
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री ललिथा यांचे निधन, 550 चित्रपटात केल्या भूमिका

टॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं मोठी लोकप्रियता मिळणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ललिथा यांच्या नावाचा समावेश करावा लागेल.

सकाळ डिजिटल टीम

KPAC Lalitha: टॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं मोठी लोकप्रियता मिळणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ललिथा यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. या अभिनेत्रीचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. त्या गेल्या काही (Entertainment News) दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनानंतर टॉलीवूड सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन् यांनी ललिथा यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. तीन दिवसांनी ललिथा KPAC Lalitha या त्यांचा जन्मदिन साजरा करणार होत्या. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले होते.

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. जेव्हा 2016 मध्ये विजयन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा ललिथा यांनी KPAC Lalitha संगीत नाटक अकादमीचे अध्यक्षस्थान भुषवले होते. (Kerala People's Arts Club (KPAC)) मध्ये काम करत असल्यानं त्यांना केपीएसी नाव मिळाले. त्याच नावानं त्यांना ओळखले जाऊ लागले.

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ केपीएसी ललिथा यांनी टॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम केलं होतं. त्यांच्या नावावर 550 हून अधिक चित्रपटांची नोंदही आहे. 1969 मध्ये त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या हटक्या अभिनय शैलीचे लाखो चाहते होते. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता. 1969 मध्ये Kootukudumbham चित्रपटातून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र दिग्दर्शक के एस सेथुमाधवन यांच्या चित्रपटांनी ललिथा यांना मोठी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांच्या वाट्याला अमाप लोकप्रियता आली. ललिथा यांना दोन राष्ट्रीय पुरस्कांरांनी गौरविण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025 : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप ! दुसऱ्या दिवशीही राज्यासह देशभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

Sunday Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात कमी वेळेत बनवा बटाटा अन् रव्यापासून स्वादिष्ट पुरी, लगेच नोट करा रेसिपी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : पुण्यात २२ तासांनंतरही गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह

आजचे राशिभविष्य - 7 सप्टेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT