Krithika Khurana esakal
मनोरंजन

Krithika Khurana: सहा महिन्यातच घटस्फोट! प्रसिद्ध सेलिब्रेटीच्या संसाराला घरघर

सोशल मीडियावर ज्या सेलिब्रेटीची नेहमीच चर्चा होत असते त्या क्रितिकाच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Krithika Khurana influencer: सोशल मीडियावर ज्या सेलिब्रेटीची नेहमीच चर्चा होत असते त्या क्रितिकाच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिचा घटस्फोट झाला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुंएसर म्हणून क्रितिकाचे नाव घेता येईल. देशातील सर्वाधिक प्रभावी इन्फ्ल्युंसर म्हणून क्रितिका ओळखली जाते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. अशा अभिनेत्रीच्या संसारिक आयुष्यात आलेल्या वादळानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून क्रितिका आणि आदित्य छाबडा यांच्यात वाद रंगल्याच्या चर्चा होत्या. त्यातच आदित्यनं सोशल मीडियावरुन कृतिका खुरानाला अनफ्रेंड केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये वेगळ्याच चर्चेला तोंडही फुटले होते .त्यानं तर सोशल मीडिया अकाउंटही डिलिट केले होते. यासगळ्यात दोन्ही सेलिब्रेटींना नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्नही विचारण्यास सुरुवात केली. अखेर कृतिकानं आपला घटस्फोट घेतल्याचे जाहिर केले आहे.

फॅशन ब्लॉगर म्हणून कृतिका अनेकांना माहिती आहे. फॅशन विश्वातील वेगवेगळ्या घडामोडींविषयी सारी माहिती देणारी कृतिका कित्येकांच्या चर्चेचा विषय असते. अशातच तिच्याविषयी खळबळजनक माहिती देणारी बातमी व्हायरल होते तेव्हा मात्र चाहत्यांच्या मनात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. अशीच ती घटस्फोटाची घटना घडली त्यानं अनेकांना धक्का बसला आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या वैयक्तिक आयुष्यात आल्यानं वादळानं ते हादरुन गेले आहेत.

सहा महिन्यांपूर्वी कृतिका आणि आदित्यचे लग्न झाले होते. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी सहा महिन्याच्या आतच एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता कृतिकानं नेटकरी आणि चाहत्यांना एक आवाहन केले आहे. त्यामध्ये तिनं त्यांना अशा कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांसाठी ‘जॅकपॉट’! IPL 2026 चा थरार गहुंजेत… युवा खेळाडूंच्या संघाचं होम ग्राऊंड! 2022 नंतर पहिल्यांदाच...

Zilla Parishad Election : अखेर ठरलं! जिल्हा परिषद निवडणूक होणार जाहीर, प्रशासकीय कामांना गती; सोमवारी घोषणा शक्य

Sangli Crime : तेच ठिकाण वेळही तीच, बदला घेतलाच! कॉलेजच्या दारातच तरुणावर चाकूने 14 सपासप वार; मांडी, डोके, हात, पोटावर घाव

Pune News:'पेरणे फाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभास वंदन'; लाखो आंबेडकरी अनुयायांचा उसळला जनसागर, रात्री उशिरापर्यंत अखंड रांगा!

Solapur Crime: साेलापुरात तृतीयपंथीचा खून, तिघांना पाच दिवसांची वाढीव कोठडी; तपासात धक्कादायक माहीती आली समाेर..

SCROLL FOR NEXT