Kriti Sanon Instagram
मनोरंजन

कृती सनन कोणाला करतेय डेट?अभिनेत्रीच्या इन्स्टा स्टोरीत दिसला मिस्ट्री बॉय

कृती सननचे याआधी 'राबता' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुशांत सिंग राजपूतसोबत देखील नाव जोडले गेले होते.

प्रणाली मोरे

सध्या बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये क्रिती सनन(Kriti Sanon) हे देखाील एक चर्चेतलं नाव आहे. अतापर्यंत तिनं अनेक नावाजलेल्या स्टारसोबत चांगले सिनेमे केले आहेत. तिच्या कामाची प्रशंसा दस्तुरखुद्द बिग बीं नी देखील केली होती. आता क्रिती चर्चेत आलीय ती एका बॉलीवूड अभिनेत्याला डेट करत असल्यामुळे. तसं पाहिलं तर 'राबता' या सुशांत सिंग राजपूतसोबतच्या सिनेमानंतर तिचं नाव त्याच्यासोबतही कही काळासाठी जोडलं गेलं होतं. अर्थात याबाबत दोघांनीही तेव्हा चुप्पी साधली होती. मात्र सुशांतच्या आत्महत्येनंतर तिनं त्याच्या आठवणीत केलेली पोस्ट गाजली होती. तिनं तेव्हा पहिल्यांदा सुशांत अन् आपल्यात मैत्रीच खास नातं होतं असं स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर पुन्हा आता क्रितीच्या डेटिंगच्या चर्चा रंगू लागल्यात. चला जाणून घेऊया कोण आहे क्रितीचा 'शहजादा'?

क्रिती सनन म्हणे सध्या मुलींचा सगळ्यात फेव्हरेट स्टार, हार्ट थ्रोब असलेल्या कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan)डेट करत असल्याची चर्चा आहे. कार्तिक आणि क्रितीची जोडी 'लुकाछुपी' मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता पुन्हा हे दोघे 'शहजादा' सिनेमाच्या निमित्तानं एकत्र पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं दोघे मॉरिशसला गेले होते. तेव्हा तिथले क्रिती सोबतचे कितीतरी सेल्फी कार्तिकनं शेअर केले अन् कॅप्शनमध्ये लिहिलं होतं,''मी या क्युट मुलीला मॉरिशसमध्ये भेटलो''. आता यामुळे चाहते मात्र वेगवेगळे अंदाज लावताना दिसत आहेत.

मॉरिशसहून शूटिंग पूर्ण करुन मुंबईत परतल्यानंतर कार्तिकनं एक व्हिडीओ शेअर केला आहेत ज्यात तो क्रितीसोबत लॉंग ड्राईव्हला गेलेली दिसत आहे. या कार राईडचं लोकेशन मात्र कार्तिकनं सांगितलेलं नाहीय. मात्र,या कार्तिकच्या व्हिडीओवर चाहत्यांनी मात्र भन्नाट कमेंट्स नोंदवल्या आहेत. कुणी म्हटलं आहे,''बी-टाऊनचं हॉट न्यू कपल'', तर कुणी लिहिलंय,''तुम्ही एकमेकांना डेटिंग केलंत तरी आमची काहीच हरकत नाही''. तर आणखी एका चाहत्यानं म्हटलं की,''तुम्ही दोघं एकमेकांसोबत छान दिसत आहात. न्यू बी-टाऊन कपल म्हणायचं का तुम्हाला?''

बरं याच्या पुढे एक पाऊल टाकत चाहत्यांनी चक्क दोघांचं नाव एकत्र करुन 'कारिती' हे नवं नाव जाहिर करुन टाकलं आहे. कार्तिकनं क्रितीसोबत शेअर केलेल्या फोटो-व्हिडीओमधून त्या दोघांची उत्तम केमिस्ट्री दिसत आहे. त्यामुळेच आता बी-टाऊनचं नवं कपल म्हणून कार्तिक-क्रितीच्या डेटिंगची चर्चा रंगली तर बिघडलं कुठे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwalच्या गळ्याभोवतीचा फास आवळला, महिला व्यावसायिकलाही धमकावलं| Pune police | Sakal News

मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार! लवकरच हाय-टेक कॅंडेला बोटी समुद्रात उतरणार, कशी आहे रचना?

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी 'आयएनएस विक्रांत'वर जवानांसोबत साजरी केली दिवाळी; म्हणाले- माझ्यासाठी भाग्याचा क्षण

World Osteoporosis Day 2025: चाळीशीतच हाडे ठिसूळ होण्याचा धोका, महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसची वाढती समस्या; जाणून घ्या कारणे अन् उपाय

भावा...! Adam Zampa च्या नावाने आर अश्विनला मॅसेज; माजी फिरकीपटूने घेतली मजा, मोहम्मद शमीलाही तोच मॅसेज अन्...

SCROLL FOR NEXT