Koffee with Karan 8 Esakal
मनोरंजन

Koffee with Karan 8: क्रिती सेननबद्दल पसरवल्या जाताय खोट्या बातम्या! अभिनेत्रीनं घेतली कायदेशीर मदत...

Vaishali Patil

Kriti Sanon On Koffee with Karan 8: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन हिची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. क्रितीने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिने 'आदिपुरुष', 'भेडिया' यांसारख्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळवली आहे. नुकतच तिच्या मिमी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मात्र आता क्रिती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. क्रिती चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट रिअॅलिटी शो 'कॉफी विथ करण 8' मध्ये दिसली होती. त्यानंतर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये क्रितीवर आरोप करण्यात आला होता की ती 'कॉफी विथ करण' मध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देत आहे.

तिथे तिने कोणत्याही प्रकारच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीच्या बातमीवर तिने नाराजी व्यक्त केली. इतकच नाही तर अभिनेत्रीने अशा बातम्या पसरवणाऱ्या विरोधात कायदेशीर मदत घेतल्याचा खुलासा केला आहे. मात्र क्रितीने पोस्ट शेयर करत या वृत्ताचे खंडन केले आणि कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

रविवारी सकाळी क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याप्रकरणी पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. यात क्रितीने लिहिले, 'काही बातम्यांमध्ये असे लिहिले आहे की मी 'कॉफी विथ करण' मध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे प्रमोशन करत आहे.

या बातम्या चुकीच्या असून चुकीच्या हेतूने पसरवल्या जात आहेत. या बातम्यांनी मला त्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी जोडून माझी प्रतिमा डागाळली आहे. मी शोमध्ये कोणत्याही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर कधीही चर्चा केलेली नाही.

तर क्रितीने पुढे लिहिले की यावर ती कायदेशीर कारवाई करणार आहे. तिने या प्रकरणी संबंधितांना  कायदेशीर नोटीस देखील पाठवली आहे. इतकच नाही तर तिने अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचे आवाहन देखील चाहत्यांना केले आहे. मात्र याबाबत सध्या करण जोहर किंवा चॅट शोकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कृती सेनन 'कॉफी विथ करण'च्या शेवटच्या सीझनमध्ये टायगर श्रॉफसोबत आली होती. इथे दोघांनी अनेक रंजक खुलासे केले. क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने प्रोडक्शन हाऊस 'ब्लू बटरफ्लाय फिल्म्स' सुरू केले आहे.

या प्रॉडक्शन हाऊसच्या 'दो पत्ती' या पहिल्या चित्रपटात क्रिती काजोलसोबत काम करणार आहे, त्यासोबतच ती 'द क्रू' या कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसेल.

ज्यात क्रितीसोबत तब्बू, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा देखील काम करणार आहेत. यासोबतच ती शाहिद कपुरसोबत रोमँटिक सायन्स फिक्शन चित्रपटात दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT