kriti sanon new production house blue butterfly connection with sushant singh rajput  SAKAL
मनोरंजन

Kriti Sanon Production House: क्रितीच्या नवीन प्रॉडक्शन हाऊसचा संबंध थेट सुशांत सिंग राजपुतशी? जाणुन घ्या

क्रितीच्या फॅन्सनी मात्र या प्रॉडक्शन हाऊसचा संबंध थेट सुशांत सिंग राजपुतशी जोडलाय.

Devendra Jadhav

Kriti Sanon Production House connection with SSR news: अभिनेत्री क्रिती सेनन ही चाहत्यांची लाडकी अभिनेत्री. अलीकडेच आदिपुरुष सिनेमात क्रिती झळकली. आदिपुरुष सिनेमा प्रेक्षकांना आवडला नसला तरीही क्रितीच्या अभिनयाचं कौतुक झालं.

आदिपुरुष सिनेमातील अपयशाची धुळ झटकुन क्रिती आता तिच्या करियरमध्ये पुढे जात आहे. क्रितीने तिचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरु केलंय. पण क्रितीच्या फॅन्सनी मात्र या प्रॉडक्शन हाऊसचा संबंध थेट सुशांत सिंग राजपुतशी जोडलाय.

(kriti sanon new production house blue butterfly connection with sushant singh rajput)

क्रितीने इंस्टाग्रामवर तिचं प्रोडक्शन हाऊस 'ब्लू बटरफ्लाय फिल्म्स'च्या लोगोचे अनावरण केले. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "आता गियर बदलण्याची वेळ आली आहे! मी या जादूच्या उद्योगात 9 वर्षांपासून माझी स्वप्ने जगत आहे.

मी लहान पाऊले उचलली, शिकली, विकसित झाली आहे आणि मी आज एक अभिनेत्री बनलीय! आता चित्रपट सृष्टीचे प्रत्येक घटक आणि पैलू, अधिक जाणून घेण्याची,

माझ्या हृदयाला स्पर्श करणार्‍या कथा तुम्हाला सांगण्याची वेळ आली आहे." अशी पोस्ट लिहून क्रितीने तिच्या नवीन प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केलीय.

फॅन्सनी जोडलं सुशांतसोबत कनेक्शन

काही चाहत्यांच्या लक्षात आले की क्रिती सॅननच्या ब्लू बटरफ्लाय प्रॉडक्शन हाऊसचा दिवंगत सुशांत सिंग राजपूतशी संबंध आहे. क्रिती आणि सुशांत दोघेही चांगले मित्र होते आणि त्यांनी राबता (2017) मध्ये एकत्र काम केले होते.

2020 मध्‍ये त्‍याच्‍या मृत्‍यूनंतर क्रितीने अनेकदा SSR ची आठवण काढलीय. सुशांत त्‍याच्‍या इंस्‍टाग्राम पोस्‍टमध्‍ये अनेकदा निळी फुलपाखरे वापरत असे.

त्यामुळे सुशांतला आदरांजली म्हणुन क्रितीने तिच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव ठेवलंय, अशी चर्चा आहे. दरम्यान क्रिती ब्लू बटरफ्लाय प्रॉडक्शन तर्फे दो पत्ती सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात काजोल प्रमुख भुमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT