Kriti Sanon Esakal
मनोरंजन

Kriti Sanon:शेवटी क्रितीनं सांगितलं तिच्या बॉयफ्रेंडचं नावं? प्रभास नव्हे तर..

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री क्रिती सेननचा 'शहजादा' हा चित्रपट नुकताच रिलिज झाला मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. मात्र प्रेक्षकांना तिची आणि कार्तिकची जोडी फार आवडली. पण सध्या 'शहजादा' व्यतिरिक्त क्रिती सेनन साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबतच्या तिच्या नात्यामुळे देखील चर्चेत आहे.

अलीकडेच प्रभास आणि क्रितीच्या एंगेजमेंटची बातमी समोर आली होती. या दोघांची मालदीवमध्ये एंगेजमेंट होऊ शकते, असा दावाही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. नंतर प्रभास आणि क्रितीच्या टीमने ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं आणि सर्वांची बोलती बंद केली.

क्रिती सेननने अलीकडेच तिच्या प्रियकराचं नाव सोशल मीडिया पोस्टद्वारे उघड केले. त्याच झालं असं की सोमवारी क्रितीने तिच्या चाहत्यांसोबत 'आस्क मी' सेशन केलं. यावेळी चाहत्यांनी अभिनेत्रीला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले.

तर तिथे एका चाहत्याने तिला थेट तिच्या बॉयफ्रेंडच नाव विचारलं. यावर क्रितीने प्रतिक्रिया देताना एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, "हे एक रहस्य आहे... अगदी माझ्यासाठीही." हे उत्तर दिल्यानंतर क्रितीही जोरजोरात हसायला लागली.

अनेकवेळा क्रितीला प्रभासच्या नावाने चिडवण्यात आलं आहे. याची सुरवात ही आदिपुरुष चित्रपटाच्या सेटनंतरच झाली. नुकतच 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरुण धवननेही क्रितीला प्रभासच्या नावाने चिडवताना दिसला होता, याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रभास आणि क्रिती एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT