Kriti Sanon’s mom shares cryptic post amid Adipurush row prabhas saif ali khan  SAKAL
मनोरंजन

Adipurush Kriti Sanon: चुका बघू नका भावना समजून घ्या.. आदिपुरुषच्या वादावर क्रितीच्या आईने सोडलं मौन

अशातच आदिपुरुषमध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सेननच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे, ती अत्यंत बोलकी आहे.

Devendra Jadhav

Adipurush Kriti Sanon Mother News: आदिपुरुष सिनेमा सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आदिपुरुष सिनेमाबद्दल विविध स्तरांमधून प्रतिक्रिया येत आहेत. सिनेमाला सडकून टीकेचा सामना करावा लागला. कलाकारांचा अभिनय, VFX अशा अनेक गोष्टींची चर्चा झाली.

अशातच आदिपुरुषमध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सेननच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे, ती अत्यंत बोलकी आहे.

काय म्हणाली क्रितीची आई?

क्रिती सेनॉनची आई गीता यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले- ‘जय श्री राम। जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत तिन तैसी…’ म्हणजेच चांगल्या विचाराने आणि दृष्टीने बघितले तर जग सुंदर दिसते.

त्यांनी असेही लिहिले आहे की प्रभू रामानेच आपल्याला शबरीच्या बोरांमध्ये त्यांचे प्रेम पाहण्यास शिकवले, ते खोटे नव्हते. म्हणूनच माणसाच्या चुकांकडे बघू नका, भावना समजून घ्या. अशी पोस्ट क्रितीच्या आईने लिहिलीय.

याआधी क्रिती सेनननेही एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, मी फक्त टाळ्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. चित्रपटावर होत असलेल्या टीकेनंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे संवाद बदलले आहेत.

हनुमानजींनी बोललेले अनेक टपोरी शैलीतील संवाद बदलले आहेत. असे असूनही 'आदिपुरुष'ला अपेक्षित असलेले यश बॉक्स ऑफिसवर दाखवता आले नाही.

दरम्यान क्रिती या चित्रपटाला सोशल मीडियावर मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाकडे लक्ष देण्याविषयी बोलली.

त्यानंतर आता तिने आरकेपुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना 'आदिपुरुष' दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिती याच शाळेत शिकली आहे.

इंग्रजी वृत्तसंस्थेनुसार, कृती सेनन 21 जूनला दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना 'आदिपुरुष' दाखवणार आहे. यादरम्यान तिचे कुटुंबही क्रितीसोबत असणार आहे.

तिने यासाठी दिल्लीतील एका मल्टिप्लेक्समध्ये शो बुक केला आहे. मात्र अद्याप क्रितीने स्वत: या बातमीची काही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरक्षणावर निर्णयानंतर माझेच लोक माझ्यावर चिडले, पण जनेतच्या मनासारखा नव्हे तर...; सरन्यायाधीशांनी सांगितला किस्सा

'लोक वारंवार मतदान करून कंटाळतात, म्हणून वन नेशन वन इलेक्शन गरजेचे'; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं महत्त्वाचं विधान

Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानपाठोपाठ अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा; १७ जणांना संधी, पण कर्णधार कोण?

‘Veo 3’ Free : व्हिडिओ एडिटर्ससाठी खुशखबर! ‘Veo 3’ सर्वांसाठी फ्री, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील हजारो महिलांचा हप्ता जूनपासून थांबला; लाडक्या बहिणी ’ संभ्रमात

SCROLL FOR NEXT