krk govinda salman 
मनोरंजन

सलमानविरोधात केआरकेला गोविंदाचा पाठिंबा?

केआरकेच्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

स्वाती वेमूल

अभिनेता सलमान खानसोबत Salman Khan सुरू असलेल्या वादात आता अभिनेता गोविंदाकडून Govinda पाठिंबा मिळाल्याचं सूचक ट्विट कमार आर. खानने Kamaal R Khan केलं आहे. स्वयंघोषित चित्रपट समिक्षक केआरकेविरोधात सलमानने मानहानीचा दावा केला आहे. 'बीईंग ह्युमन' संस्थेमार्फक आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केआरकेने केला होता. त्याविरोधात सलमानकडून मानहानीचा दावा करण्यात आला आहे. तेव्हापासून केआरकेने सलमानला धडा शिकवणार असल्याचा निर्धारच केला आहे. याप्रकरणात विविध बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत असल्याचाही दावा त्याने केला होता. आता त्याने केलेलं गोविंदासंदर्भातील ट्विट पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (KRK thanks Govinda bhai for support amid Salman Khan row)

'गोविंदा भाई, तुमच्या प्रेमासाठी आणि सहकार्यासाठी धन्यवाद. मी तुम्हाला निराश करणार नाही', असं ट्विट केआरकेने केलंय. गोविंदा आणि सलमान यांच्यातील जुना वाद सर्वश्रुत आहे. याचाच फायदा घेत केआरकेने ट्विट केलं असावं, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केआरकेने २०१९ मध्ये केलेल्या ट्विटमध्ये गोविंदावर टीका केली होती. 'गोविंदा हा त्याच्या काळातील सर्वांत अनप्रोफेशनल अभिनेता होता. त्याने अनेक निर्मात्यांचं आर्थिक नुकसान केलं. आता त्याच्याशी बॉलिवूडमधील कोणीच संपर्क साधू इच्छित नाही. जसं कर्म कराल, तसं त्याचं फळ मिळेल', असं ट्विट केआरकेने केलं होतं.

केआरकेने त्याच्या ट्विट्समध्ये सलमान खानलाही धमकी दिली होती. 'त्याने अनेक लोकांचं करिअर उद्ध्वस्त केल्याचं ऐकलंय. पण आता मी त्याचं करिअर बर्बाद करून त्याला रस्त्यावर आणेन', असा निर्धार त्याने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT