KRK And Virat Kohli esakal
मनोरंजन

विराट कोहलीच्या डिप्रेशनवर केआरकेचे ट्विट, म्हणाला - लग्न केल्याचा परिणाम!

केआरकेने विराटच्या नैराश्यासाठी अनुष्का शर्माला जबाबदार धरले आहे.

सकाळ डिजिटल टीम

KRK Tweet On Virat Kohli Depression : अभिनेता आणि समीक्षक केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवर तो आपले मत मोकळेपणाने व्यक्त करतो. केआरके (KRK) सिनेमापासून राजकारणापर्यंत आणि देश-विदेशातील मुद्द्यांवर ट्विट करत असतो. या दरम्यान त्याने क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नैराश्यावर आपले मत मांडले आहे. केआरकेने विराटच्या नैराश्यासाठी अनुष्का शर्माला जबाबदार धरले आहे. केआरके या ट्विटमुळे ट्रोल होत आहे.

काय आहे केआरकेचे ट्विट

केआरकेने त्याच्या ट्विटरवर विराट कोहलीचे (Virat Kohli) एक कोट पोस्टर शेअर केले आहे. यासोबतच त्याने ट्विटमध्ये विराटच्या डिप्रेशनसाठी अनुष्का शर्माला जबाबदार धरले आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'विराट कोहली हा भारतातील पहिला क्रिकेटपटू आहे, जो नैराश्याशी झुंज देत आहे. एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचा हा परिणाम आहे. त्याला नैराश्याने ग्रासले आहे हे त्याने आपल्या मनात ठसवले असावे.

काय आहे विराटच्या कोटचे पोस्टर

केआरकेने शेअर केलेल्या विराटच्या पोस्टरवर लिहिले आहे की, 'मी मानसिकदृष्ट्या खचलो आहे हे स्वीकारण्यात मला लाज वाटत नाही आणि हे अगदी सामान्य आहे. परंतु आम्ही त्याबद्दल बोलत नाही. कारण आम्ही संकोच करतो, कारण आम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत दिसायचे नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, बलवान असल्याचा आव आणणे दुर्बल असण्यापेक्षा वाईट आहे.'सोशल मीडियाची प्रतिक्रिया कशी आहे. (Entertainment News)

केआरकेचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडिया यूजर्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. या ट्विटमुळे बहुतांश सोशल मीडिया यूजर्स केआरकेला ट्रोल करत आहेत. केआरकेला अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवल्यामुळे ट्रोल केले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या काही चाहत्यांनी तर केआरकेसाठी अर्वाच्य शब्दही वापरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT