KRK Tweet esakal
मनोरंजन

KRK Tweet : 'आता तीन पाकिस्तानी मुलींशी लग्न करुन त्यांना घरी आणणार'! केआरकेचं दुसऱ्यांदा गुडघ्याला बाशिंग

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये बेताल वक्तव्यं करुन नेहमीच चर्चेत राहणाऱ्या केआरकेची गोष्टच वेगळी आहे. त्यानं आतापर्यत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

KRK Tweet : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये बेताल वक्तव्यं करुन नेहमीच चर्चेत राहणाऱ्या केआरकेची गोष्टच वेगळी आहे. त्यानं आतापर्यत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. त्यामध्ये भाईजान सलमान खान, आमीर खान आणि शाहरुख खान यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या चित्रपटाचे केलेले रिव्ह्यु इतके वादग्रस्त होते की त्यामुळे केआरके अडचणीत आला होता.

आता तो पुन्हा त्याच्या एका वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. काही करुन सतत चर्चेत राहणे हे केआरकेला जमते. त्यामुळे चर्चेतील विषय, बॉलीवूड चित्रपट, त्यातील कलाकार यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसतो. यावेळी त्यानं पठाणचा रिव्ह्यु जरा जपूनच केला. त्याचे कारण सलमान खाननं त्याला शिकवलेला धडा. आपली बदनामी केल्याप्रकरणी सलमाननं त्याला कोर्टात खेचलं होतं.

Also Read - ...तर जाईल हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले

केआरकेनं दुसऱ्यांदा लग्नाचा निर्णय घेतला आहे. त्यानं ट्विट करुन ही बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. त्याच्या त्या ट्विटला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्याला पाकिस्तानमधील तीन मुलींशी लग्न करायचं आहे. आणि त्यांना भारतात घेऊन यायचं आहे. आता असं बोलल्यावर त्याला नेटकऱ्यांनी खरमरीत प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

केआरके त्या ट्विटमध्ये म्हणतो, इस्लामध्ये चार पत्नीशी विवाह संमत आहे. त्यामुळे मला पाकिस्तानमधील तीन मुलींशी विवाह करायचा आहे. नेहमीप्रमाणे केआरके त्याच्या या ट्विटमुळे ट्रोलही झाला आहे. भलेही केआरकेनं ही गोष्ट चेष्टेमध्ये म्हटली असली तरी त्याला सोशल मीडियावर आता ट्रोल केले जात आहे. आपल्या अशाच प्रकारच्या वक्तव्यामुळे तो अनेकदा अडचणीत आला आहे.

केआरकेच्या त्या व्टिटवर त्याला युजर्सनं जशास तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, तुला भारतामध्ये मुलींची काही कमी होती का, दुसऱ्यानं लिहिलं आहे की, तुला पुन्हा बायको मिळाली हीच मोठी नवलाईची गोष्ट आहे. केआरके त्याच्या त्या अशा वक्तव्यामुळे नेटकऱ्यांचा ओरडा खाताना दिसतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT