govinda krishna
govinda krishna 
मनोरंजन

'द कपिल शर्मा शो'मध्ये गोविंदाच्या एंट्रीनंतर कृष्णा अभिषेकची एक्झिट

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रसिद्ध टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात एक मोठा धमाका होणार आहे. बॉलीवूडचा हिरो नंबर वन गोविंदा यावेळी कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. या एपिसोडचे कित्येक प्रोमो वाहिनीने त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र सगळ्या व्हिडिओंमध्ये एक व्यक्ती दिसत नाहीये आणि ती व्यक्ती म्हणजे कृष्णा अभिषेक.

वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या एपिसोडचे दोन प्रोमो रिलीज केले आहेत. यामध्ये कपिल शर्मासोबत कीकू शारदा, चंदन प्रभाकर आणि सुमौना चक्रवर्ती दिसत आहेत. मात्र कृष्णा अभिषेक यात कुठेच दिसून येत नाहीये आणि हीच गोष्ट चाहत्यांच्या नजरेत सापडल्याने त्यांना हे खटकतंय. 

त्याचं झालं असं की कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा गोविंदा यांच्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून वाद सुरु आहे. गोविंदा अनेकदा कपिल शोमध्ये येऊन गेला आहे मात्र जेव्हा पण गोविंदाची या शोमध्ये एंट्री होते तेव्हा कृष्णा अभिषेकची एक्झिट होताना पाहायला मिळते. मिडिया रिपोर्ट्सनुसार गोविंदाला कृष्णा अभिषेक त्यांच्या समोर येऊ नये असं वाटत असल्याचं म्हटलं जातंय.

ही गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रोमोवर कमेंट करायला सुरुवात केलीये.  एकाने म्हटलंय, ''जेव्हा कधी गोविंदा येतो तेव्हा कृष्णा गायब होतो.'' दुस-याने म्हटलंय, ''मामा समोर भाचा का येत नाही? मागच्या वेळीही असंच झालं होतं. हे लोक असं का करतात?''  

krushna abhishek missing when govinda reaches in the kapil sharma show  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT