Miss World 2024 esakal
मनोरंजन

Miss World 2024: चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली 'मिस वर्ल्ड'; थाटात पार पडली स्पर्धेची अंतिम फेरी

चेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिस्कोव्हा (Krystyna Pyszkova) ही 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती ठरली आहे.

priyanka kulkarni

Miss World 2024: 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा (Miss World 2024) काल थाटात पार पडली. मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले काल (9 मार्च) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे झाला. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा (Krystyna Pyszkova) ही या स्पर्धेची विजेती ठरली आहे. माजी मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का हिने क्रिस्टिना पिस्कोव्हाला मिस वर्ल्डचा क्राऊन दिला. लेबनॉनची यास्मिना (Yasmina Zaytoun) ही स्पर्धेत रनर-अप ठारली.

28 वर्षांनंतर भारतात पार पडली मिस वर्ल्ड स्पर्धा

तब्बल 28 वर्षांनंतर भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली. करण जोहर आणि मिस वर्ल्ड 2013 मेगन यंग फिलिपिन्स यांनी मिस वर्ल्ड स्पर्धा होस्ट केली.

भारताच्या सिनी शेट्टीने टॉप-8 स्पर्धकांच्या यादीत मिळवलं स्थान

मिस वर्ल्ड फिनालेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनी शेट्टीने टॉप 8 मध्ये स्थान मिळवले. यानंतर ती टॉप-4 मधून बाहेर पडली.

टॉप 4 स्पर्धक

मिस त्रिनिदाद आणि टोबॅगो, मिस बोत्सवाना, मिस चेक रिपब्लिक आणि मिस लेबनॉन यांनी टॉप 4 स्पर्धकांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले.

12 जणांचा पॅनल

मिस वर्ल्ड फिनाले 2024 च्या परीक्षकांमध्ये बारा जणांचा समावेश होता. यामध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि पूजा हेगडे, चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला, अमृता फडणवीस, विनीत जैन, क्रिकेटर हरभजन सिंग, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया मोर्ले सीबीई, पत्रकार रजत शर्मा आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

'या' कलाकारांनी केलं परफॉर्म

गायक शानने त्याचे 'तू आज की नारी' हे गाणे मिस वर्ल्ड 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये गायलं. शान व्यतिरिक्त टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनीही फिनालेमध्ये परफॉर्म केले. नेहा कक्करने 'काला चष्मा' हे गाणे गायले, तर टोनीने 'धीमे धीमे' गाऊन संमेलनात रंगत आणली.

जाणून घ्या क्रिस्टीनाबद्दल

क्रिस्टीनाचे क्रिस्टीना पायस्को फाउंडेशन नावाचे एक फाउंडेशन आहे. टांझानियामधील मुलांसाठी तिनं अनेक कामे केली आहेत. तिने गरीब मुलांसाठी इंग्रजी शाळा सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : लालबाग राजाची मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवर

Chh. Sambhajinagar: गणेश विसर्जनावेळी जीवघेणा प्रसंग; गणेश भक्ताला जीवनरक्षक दलाने दिले वेळेवर जीवनदान

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

SCROLL FOR NEXT