Kubbra Sait Reveals She Was Sexually Abused  Instagram
मनोरंजन

'माझं लैंगिक शोषण केलं ते माझ्याच...'; कुब्रा सैतचा धक्कादायक खुलासा

'सेक्रेड गेम्स' या प्रसिद्ध वेबसिरीजमधील कुकू उर्फ अभिनेत्री कु्ब्रा सैत हिनं आपल्या पुस्तकात काही खळबळजनक दावे केले आहेत.

प्रणाली मोरे

'सेक्रेड गेम्स'(Sacred Games) या वेब सीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कुब्रा सैत(Kubbra Sait) उर्फ कुकू हिनं आपल्या एका पुस्तकातून स्वतःचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. कुब्रानं सांगितलं आहे की त्या व्यक्तीला ती 'अंकल' म्हणून हाक मारत असे. 'त्यानं कुब्राच्या कुटुंबियांची मदत केली होती,आणि त्याच माणसानं १७ वर्षांच्या कुब्राचं लैंगिक शोषण केलं होतं. कु्ब्राच्या म्हणण्यानुसार तो माणूस तब्बल अडीच वर्ष तिचं लैंगिक शोषण करत राहिला. आणि ती काहीच करू शकली नाही.(Kubbra Sait Reveals She Was Sexually Abused)

कु्ब्रा सैतच्या म्हणण्यानुसार तो माणूस ज्याला ती 'अंकल' म्हणायची, त्यानं तिच्या कुटुंबाला जेव्हा आर्थिक मदतीची गरज होती तेव्हा पैशाची मदत केली होती. त्यामुळे घरच्या सर्वांच्याच मनात त्याच्याविषयी खूप आदर होता. ती म्हणाली, तो माझं लैंगिक शोषण करत असेल अशी शंकाही त्यांच्या मनात डोकावली नाही. तो माणूस माझ्या आईला सारखं म्हणायचा की तिला पैशाची चिंता करायची काहीच गरज नाही. पण मला कळत होतं त्या बदल्यात तो किती मोठं पाप माझ्यासोबत करत होता''.

कुब्रानं यांसदर्भात सांगताना पुढे असं म्हटलंय की, ''कारच्या मागच्या सीटवर मी एकदा बसली होती,तेव्हा तो माणूसही माझ्या बाजूला बसला होता. त्यानं त्याचा हात नको तिथे लावायला सुरुवात केली अन् मी तिथेच कोसळले. तो माझ्या अंर्तभागाला आणि गालांना घाणेरडा स्पर्श करू लागला. त्या व्यक्तीशी आपल्या कुटुंबाची ओळख एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. त्यानंतर त्यानं हळूहळू हेतूपुरस्सर माझ्या कुटुंबासोबत जवळीक वाढवली. आणि आमच्या कुटुंबाच्या सगळ्याच गोष्टींमध्ये तो सहभाग नव्हे, दखल देऊ लागला. सारखं घरी यायचा आणि पैशांची मदत करायचा''.

कु्ब्रानं पुढे आपल्या पुस्तकात लिहिलं आहे,एकदा आई खूप रडत होती,वडील घर सोडून जायची धमकी देत होते. तेव्हा कु्ब्रा म्हणाली,''मी स्वतः त्या माणसाला फोन करुन मदत मागितली होती. तेव्हा त्या माणसानं मदत करतो याबदल्यात तिला एका हॉटेलला बोलावलं होतं. तिथं गेल्यावर त्या माणसानं तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करायला सुरुवात केली,तिला तेव्हा जोरजोरात ओरडायचं होतं पण ती काहीच करू शकली नाही''. पुढे कु्ब्रा म्हणाली,''तो आपले कपडे काढू लागला मला तेव्हा काहीच सूचत नव्हतं. फक्त डोळ्यासमोर भयानक अंधार दाटून आला माझ्यासोबत काहीतरी भयानक घडणार या भीतीनं. त्या माणसाचं लग्न झालं होतं. तो एका मुलाचा बाप होता. तरी त्यानं तब्बल अडीच वर्ष माझं लैंगिक शोषण केलं''.

कु्ब्रानं जेव्हा हे सगळं तिच्या आईला सांगितलं तेव्हा ती खूप रडली होती. आणि आईनं हात जोडून कु्ब्राची माफी मागितली होती. कुब्रा सैतनं सांगितलेला हा अनुभव ऐकून अंगाचा थरकाप उडाला असेल हे मात्र निश्चित. कारण माणूस वाईट आहे हे माहित असतं तेव्हा असं काही घडलं तर कदाचित इतका धक्का बसणार नाही जितका चेहऱ्यावर चांगुलपणाचा मुखवटा घालून लोक असं दृष्कृत्य करतात तेव्हा बसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी मविआत बिघाडी? राज तर सोडा, उद्धव सोबतही आघाडी नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

PAK vs SA 2nd Test: तरुणांनी माती खाल्ली, तिथे 'वयस्कर' खेळाडूने पाकिस्तानची लाज वाचवली! मोडला ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम, पण...

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान जमीन खचली; पोलिसांनी असं काही केलं की...

Latest Marathi News Live Update : लातूर जहीराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी मांडली चटणी-भाकरीची पंगत

IND vs AUS 2nd ODI: रोहित निघून जाताच, गंभीर- आगरकरची Yashasvi Jaiswal सोबत चर्चा; उद्या खेळणार का? कोच म्हणाले...

SCROLL FOR NEXT