kumar sanu and anu malik 
मनोरंजन

असा घेतला कुमार सानुनं अनु मलिकचा बदला...

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खानच्या 'बाजीगर' या चित्रपटाने 1990मध्ये धुमाकूळ घातला होता. आजही या चित्रपटाची गाणी तितक्याच आवडीने ऐकली जातात. या हीट गाण्यांमुळे गायक कुमार सानु आणि अनु मलिक त्यावेळी चर्चेत आले होते. 'चुराके दिल मेरा', 'तुझे देखा तो' या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या गाण्यांचे गायक कुमार सानु यांनी नुकतेच त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण केले.

सध्या झी टीव्हीवर सुरू असणाऱ्या 'सा रे ग म प' या रिअ‍ॅलिटी शो मध्ये त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भेट दिली होती. शो मध्ये कंटेस्टंट युमना अझीन हिने 'काली काली आखे' हे सुपरहीट गाणं गायले. सानु यांनी ही स्टेजवर जाऊन तिच्या सोबत गायला लागले. बाजीगरमध्ये अनु मलिक यांच्या ज्या ओळी होत्या त्याच सानुंनी यावेळी गायल्या.

या गाण्याच्या रेकॅार्डिंग वेऴीचे किस्से त्यांनी शो मध्ये सांगितले. ते म्हणाले, की माझी इच्छा असून देखील मला अनु मलिकने 'काली काली आखे' या गाण्यातला रॅप पार्ट गायला दिला नाही. तेव्हापासून मला तो पार्ट गाण्याची मनापासून इच्छा होती. बाजीगर चित्रपटानंतर मला त्यांचा बदला घ्यायचा होता. त्या वेळीचं ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न या 'सा रे ग म प'च्या मंचावर पूर्ण झाला.

'सा रे ग म प'च्या या 18 व्या पर्वाचे परीक्षक विशाल ददलानी, शंकर महादेवन व हिमेश रेशमिया असून, या शो चा होस्ट आदित्य नारायण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : दिवाळी पाडव्यादिवशी सोन्या-चांदीत घसरण; तुमच्या शहरातील नवीन भाव काय? जाणून घ्या

India vs Australia 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ विजयाचे फटाके फोडणार? रोहित-विराट पुन्हा असेल केंद्रस्थानी...

Maharashtra Rain Alert : राज्यासाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज....

Gold Prices Fluctuate : सोन्याचा दर सकाळी वाढला, रात्री घटला; दर काय राहणार सराफ व्यावसायिकांचे लक्ष

'शनिवारवाड्यात मस्तानी यांनीसुद्धा अनेकदा नमाज पठण केलं असेल'; वादानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपवर निशाणा

SCROLL FOR NEXT