Kunal Khemu Birthday special story kunal and soha ali khan love story sakal
मनोरंजन

Kunal Kemmu Birthday: प्रेमासाठी कुणालनं करपलेलं जेवणही खाल्लं.. अशी आहे कुणाल-सोहाची लव्हस्टोरी..

आज अभिनेता कुणाल खेमूचा वाढदिवस, त्यानिमित्ताने वाचा ही खास गोष्ट..

नीलेश अडसूळ

Kunal Kemmu Birthday: बॉलिवूड अभिनेता आणि पतोडी घराण्याचा जावई कुणाल खेमू याचा आज वाढदिवस. कुणाल आजवर अनेक चित्रपटातून आपल्या भेटीला आला आहे. त्याने काही चित्रपटात गंभीर भूमिकाही केल्या पण त्याच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या.

बॉलीवुडमधील त्याच्या करियरपेक्षा लोकांना उत्सुकता असते ती त्याच्या खासगी आयुष्याची. कारण कुणालचं प्रेमप्रकरण, लग्न आणि संसार हे कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत.

कुणाल खेमू आणि सैफ अली खान याची बहीण सोहा अली खान यांच्या प्रेमप्रकरण बरेच गाजले होते. त्यांनी नंतर लग्नही केले आणि ते सुखाने संसार करत आहेत. पण कुणाल आणि सोहाची लव्हस्टोरी काहीशी खास आहे. कुणालने आपल्या प्रेमासाठी करपलेलं जेवणही खाल्लं होतं.. त्याचाच हा किस्सा..

(Kunal Khemu Birthday special story kunal and soha ali khan love story)

कुणाल आणि सोहा 'ढूँडते रह जाओगे या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. मात्र त्यावेळी त्यांच्यात काही खास बोलणं सुरू झालं नाही. या चित्रपटात दोघेही खूपच प्रोफेशनल राहून काम करत होते.

त्यांनतर त्यांची पुन्हा भेट '99' या चित्रपटाच्या सेटवर झाली. (bollywood news )त्यावेळी पहिल्यांदा सोहा अली खानला कुणाल विषयी काहीतरी वाटून गेलं आणि तिथेच त्यांनी एकमेकांना मैत्रीचा हात पुढे केला.

कुणालला सोहा विषयी कायमच हेवा वाटायचा कारण, इतकी शिकलेली मुलगी, तेही ऑक्सफर्डमधून पदवी प्राप्त केलेली मुलगी  या क्षेत्रात काय करतेय, असं त्याला वाटायचं.

हळूहळू त्यांच्यात संवाद सुरु झाला आणि दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं. त्यातूनच पुढे त्यांचं प्रेम फुलत गेलं. कुणालने खास फिल्मी अंदाजात सोहाला प्रपोज केलं होतं.


यांच्या प्रेमातली एक गंमत म्हणजे, सोहाला स्वयंपाक अजिबात करता येत नव्हता. सोहा आयुष्यात कधीच किचनमध्ये गेली नव्हती. पण लग्नापूर्वी सोहाने कुणालवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी स्वतः स्वयंपाक करण्याचा निर्णय सोहाने घेतला आणि काहीतरी पदार्थ करू लागली.

पण झालं असं की, संपूर्ण स्वयंपाक तिनं करपवून ठेवला. पान कुणालचा तिच्यावर प्रचंड जीव होता. त्यामुळे कुणालने ते अगदी प्रेमाने खाल्लं. त्यांनतर त्यांनी सोहाच्या आईसोबत म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासोबत लग्नाची बोलणी केली .

कुणाल आणि सोहा हे 2015 मध्ये लग्नबंधनात अडकले. आता त्यांना एक मुलगी असून तिचे नाव 'इनाया' असे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT