kushal badrike shared apology to prajakta mali for ranbazar  sakal
मनोरंजन

कुशल बद्रिकेने मागितली प्राजक्ता माळीची माफी.. म्हणाला, तू माझी..

'रानबाजार' या वेबसिरिजचे कौतुक करताना प्राजक्ताचा उल्लेख त्याने टाळला होता.

नीलेश अडसूळ

prajakta mali : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची रानबाजार या वेबसिरीजची चर्चा अधिक रंगली आहे. वेब सीरिजच्या पहिल्या टीजरपासून यामध्ये बोल्ड दृश्य दाखवण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची विशेष चर्चा रंगली होती. या वेब सिरिज मध्ये प्राजक्ताने एका वेश्येची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तीला प्रचंड मेहनत करावी लागली. प्राजक्ताच्या स्वभावाच्या पूर्णतः विरुद्ध अशी ही भूमिका होती. त्यामुळे तिने या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी अनेक सायास केले आहेत. पण इतकी महत्वाची भूमिका असतानाही तिच्या या भूमिकेकडे अभिनेता कुशल बद्रिकेने (kushal badrike) पोस्ट लिहिताना दुर्लक्ष केले. प्राजक्ता माळीच्या फॅन्सने त्याचा समाचार घेतल्याने ही चूक त्याला चांगलीच महागात पडली आहे. अखेर त्याने माफी मागितली आहे. (kushal badrike shared apology to prajakta mali for ranbazar)

अभिनेता कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) रानबाजार वेबसिरिज पाहून एक पोस्ट शेअर केली. यामध्ये कुशलने सर्वांचे कौतुक केले पण प्राजक्ता माळीला मात्र बगल दिली आहे. कुशलने आपल्या पोस्टमध्ये प्राजक्तासाठी एकही शब्द लिहिला नाही. त्याची ही चूक प्राजक्ताच्या चाहत्यांनी अचूक हेरली आहे. तसेच प्राजक्ताच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. या पोस्टमध्ये प्राजक्ता कुठे आहे, प्राजक्ताचा अभिनय तुला आवडला नाही का, प्राजक्ताचा उल्लेख व्हायला हवा. कारण तिने कामही तितकं दर्जेदार केलंय अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. अखेर याची दखल स्वतः कुशलने घेतली असून प्राजक्ताची माफी मागितली आहे. माझ्याकडून हे चुकून झालं, असंही तो म्हणाला.

त्याच्या पोस्ट मध्ये त्याने म्हंटले आहे, 'मी समस्त news media आणि विशेष प्राजक्ता माळी चे fans यांची क्षमा मागतो, प्राजक्ताच नाव लिहायच चुकून राहिल. प्राजक्ता, पांडू ह्या सिनेमातली माझी सहकलाकार आहेच, शिवाय ती माझी खुप चांगली मैत्रीण सुद्धा आहे. पण आता ती बहुतेक “दिवाळीसाठी दरवर्षी आवर्जुन जे उटण, तेल वगैरे gift म्हणुन पाठवते ते पाठवणार नाही. तुम्हाला त्याचं पाप लागेल. आणि तुम्हाला मोती साबण न मिळाल्याने तुमची पहिली आंघोळ चुकेल. प्राजक्ता तु मस्त काम केलस यार . तुला personally sorry म्हणतो.
बाकी सगळ्या कलाकारांनीच काय तर त्या घुबडाने सुद्धा भारी काम केलय. तर plz “रान बाजार” बघा,' अशा गमतीशीर शब्दात कुशलने प्राजक्ताची माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT