Kushal Badrike Instagram
मनोरंजन

Kushal Badrike: एखादं प्रोजेक्ट मिळावं म्हणून दिग्दर्शकासमोर काय-काय करावं लागतं.., कुशलनं शेअर केला भन्नाट व्हिडीओ

लंडनमध्ये सिनेमाच्या शूटिंगसाठी गेलेला कुशल बद्रिके सध्या खूप मजेदार व्हिडीओ शेअर करत चर्चेत येताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Kushal Badrike Video: कुशल बद्रिके सध्या सोशल मीडियावर भलताच चर्चेत पहायला मिळतोय. 'चला हवा येऊ द्या' या त्याच्या कॉमेडी शो मुळे तो घराघरात ओळखला जातो अन् त्यामुळे सोशल मीडियावर त्याचं फॅनफॉलोइंगही तगडं पहायला मिळतं.

सध्या तो सिनेमाच्या शूटिंग निमित्तानं लंडनमध्ये तळ ठोकून आहे. अनेकदा तिथले फनी व्हिडीओ तो शेअर करताना दिसतो. त्याच्यासोबत दिग्दर्शक संजय जाधव,अभिनेता संजय नार्वेकर आणि प्रार्थना बेहरे देखील धमाल करताना दिसतात.

नुकताच कुशलनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात 'दुनियादारी' फेम दिग्दर्शक संजय जाधवनं त्याला कोणतंही प्रोजेक्ट हातातून जाऊ नये म्हणून सल्ला दिला आहे तर त्याचवेळी संजय नार्वेकरांनी कुशलला यासाठी सल्ला देत संजय जाधवची बोलती बंद केली आहे.

कुशलनं शेअर केलेला हा व्हिडीओ भन्नाट आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय आहे त्या व्हिडीओत.(Kushal Badrike Video reel Marathi actor london shooting)

कुशल बद्रिकेनं व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे की,'कलाकार म्हणून एखादं project मिळवणं ही सुद्धा एक कलाच आहे, पण ते कसं मिळवायचं हे जेव्हां आपले seniors आपल्याला शिकवतात……'

आता या व्हिडीओत आपण सुरुवातीला पाहू शकतो की दिग्दर्शक संजय जाधव,कुशल बद्रिके आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिघे उभे आहेत. आणि वरिष्ठ संजय जाधव हे कुशल,प्रार्थनाला कोणताही प्रोजेक्ट हातातून जाऊ नये यासाठी काय करायचं हे समजावून सांगताना म्हणतायत, ''दिग्दर्शकासमोर ब्रॅन्डेड शूज,ब्रॅन्डेड कपडे, ब्रॅन्डेड वॉच घालून जा आणि अंगावर ब्रॅन्डेड परफ्यूम लावा मग बघा दिग्दर्शकाला तुम्हीच त्याच्या सिनेमाचे हिरो किंवा हिरोईन असं वाटायला एक सेकंद देखील लागणार नाही''.

संजय जाधवचा सल्ला ऐकून कुशल आणि प्रार्थना धन्य होतंच आहेत इतक्यात संजय नार्वेकर तिथे येतात अन् विचारतात काय झालं..

कुशल त्यांना सगळं पुन्हा समजावून सांगतो. तेव्हा संजय नार्वेकर चांगला प्रोजेक्ट हातातून जाऊ नये म्हणून काय करायचं यावर एकाच शब्दात उत्तर देत संजय जाधवची बोलती बंद करतात.

नार्वेकर म्हणतात,चांगला प्रोजेक्ट हातातून जाऊ नये म्हणून ...''उत्तम अभिनय''...एवढंच करा. हे उत्तर ऐकल्यावर कुशल आणि प्रार्थनाचे चेहरे बघण्यासारखे होतात तर संजय जाधव तिकडून पळच काढतात.

सध्या कुशलच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत. एकानं कुशलच्या प्रेमात लिहिलं आहे की, 'तू इतका चांगला अभिनय करतोस की तुझ्या हातून कोणताच प्रोजेक्ट जाणार नाही'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT