kushal tondon  Team esakal
मनोरंजन

'माझं हॉटेल पाडलं, मुंबईच्या पावसा तुला मनःपूर्वक धन्यवाद'

काही ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झाली आहे. लोकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - पावसानं आता कहर केला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्यानं मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं अनेकांचं मोठ नुकसान झालं आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झाली आहे. लोकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. पावसानं मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनाही चांगलचं झोडपलं आहे. कित्येक कलाकारांनी साईड बिझनेस म्हणून मुंबईमध्ये हॉटेल्स सुरु केली आहे. मात्र मुसळधार पावसानं त्यांचे नुकसान झाले आहे. (kushal tandon restaurant damage due to heavy rain actor facing 25 lacs rupees lose yst88)

अभिनेता कुशालनं गेल्या वर्षी मुंबईमध्ये एक रेस्टॉरंट सुरु केल होतं. मात्र आता पावसामुळे ते मोडून पडलं आहे. सततच्या पावसानं त्या हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती कुशलनं त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. कुशलनं आपल्या रेस्टॉरंटचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. यावेळी त्यानं लिहिलं आहे की, मुंबई पावसाला धन्यवाद, त्यानं माझ्या हॉटेलची नुकसान केली त्याबद्दल. कोरोनानं जो ताप दिला तो कमी होता की काय म्हणून पावसानं आता माझा बदला घेतला आहे. अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे.

kushal tondon

कुशलला एका गोष्टीचं समाधान आहे. ते म्हणजे रेस्टॉरंटमधील कुणालाही इजा झालेली नाही. तो म्हणतो, स्टोरीचा दुसरा पार्ट चांगला आहे. तो म्हणजे कोणालाही काहीही झालेलं नाही. कुशलनं एका चॅनेलशी बातचीत केली. तेव्हा तो म्हणाला, माझं खुप नुकसान झालं आहे. त्याचे वाईट वाटते. पण निसर्गाच्या पुढे काय करणार, जवळपास 20 ते 25 लाखांचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा हे ठीक करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ते करावे तर लागेलच. पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागेल. त्याशिवाय सध्या तरी दुसरा ऑप्शन नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pune News : हवेची गुणवत्ता वाढल्याने पुण्याचा देशात १० वा क्रमांक

Hingoli Accident : भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; बसची विद्युत खांबाला धडक

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

SCROLL FOR NEXT