KWK: Kriti Sanon Reveals Why Her Mother Didn't Allow Her To Do 'Lust Stories'; I Come From A Middle-Class Family sakal
मनोरंजन

KWK: आईमुळे 'लस्ट स्टोरीज' करण्यास दिला नकार, कारण.. कृती सननचा मोठा खुलासा..

कॉफी विथ करण मध्ये कृती सनन सहभागी झाली होती, यावेळी तिने कुटुंबातील काही गोष्टी उघडपणे सांगितल्या.

नीलेश अडसूळ

koffee with karan 7 : कॉफी विथ करणच्या सातव्या सिजनमध्ये अनेक कलाकार हजेरी लावत आहेत. सारा असो, आलिया किंवा रणवीर अशा अनेकांची अनेक गुपिते बाहेर आली आहेत. नुकतीच या शो मध्ये अभिनेत्री कृती सननने (kriti sanon) हजेरी लावली होती. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्यासह आपल्या कामावर भाष्य केले. या कार्यक्रमात करणने तिला काही नाकारलेल्या प्रोजेक्ट विषयी प्रश्न विचारले, ज्यावर अगदी मनमोकळे पणाने उत्तर दिले. (KWK: Kriti Sanon Reveals Why Her Mother Didn't Allow Her To Do 'Lust Stories'; I Come From A Middle-Class Family)

करण जोहरच्या 'लस्ट स्टोरीज' या काहीशा बोल्ड चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेसाठी त्याने कृती सननला विचारले होते. परंतु कृतीने या प्रोजेक्टला नकार दिला. त्यानंतर करणने कियारा अडवणीला विचारले आणि तिनेच ही भूमिका साकारली. त्यावरूनच करणने तिला प्रश्न विचारला, करण म्हणाला लस्ट स्टोरीज मध्ये तूच प्रमुख भूमिकेत असावी अशी माझी इच्छा होती. पण तू त्याला नकार दिलास, कारण तुझ्या आईची त्याला परवानगी नव्हती. पण नेमकं काय झालं होतं.

त्यावर कृती म्हणाली, 'आईला जेव्हा मी या प्रोजेक्ट बाबत विचारले तेव्हा तिने साफ नकार दिला. कारण तीची हरकत लस्ट स्टोरीजच्या स्क्रिप्टवर होती. आई म्हणाली की, यामध्ये विषयापेक्षा बोल्ड दृश्यांवर अधिक फोकस केले आहे. अशा प्रोजेक्टवर काम न केलेलंच बरं. एखाद्या चित्रपटात २० मिनिटांचे कामुक सीन असतील तर ठीक आहे पण इथे संपूर्ण चित्रपटच बोल्डनेसवर बेतलेला होता.' असा खुलासा कृतीने केला.

त्यावर करण तिला म्हणाला, मी खरच तुला कास्ट करण्यासाठी खूप उत्सुक होतो, तेव्हा कृती म्हणाली, 'मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे आणि त्यांच्यासाठी असे विषय हे वादग्रस्त आणि थोडे धक्कादायक असू शकतात. म्हणून मी नेहमीच आईला विचारते असं नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपमधला अंतर्गत वाद उफाळला

Save Tigers: धक्कादायक! देशात १६९ तर राज्यात ४१ वाघांचे मृत्यू; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४५ वाघांचे अधिक बळी..

Sinnar Accident : मोहदरी घाटात काळजाचा थरकाप! कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनांना चिरडले; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT