Laal Singh Chaddha On netflix  esakal
मनोरंजन

LSC On Netflix: आमिरनं नेटफ्लिक्सवर गुपचूप प्रदर्शित केला 'लाल सिंग चढ्ढा'!

नेटकऱ्यांनी आमिर खानच्या बॉयकॉट लाल सिंग चढ्ढाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आमिरला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Laal Singh Chddha On Netflix: नेटकऱ्यांनी आमिर खानच्या बॉयकॉट लाल सिंग चढ्ढाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आमिरला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं. पहिल्यांदाच आमिर एवढा निराश दिला. वास्तविक नेटकऱ्यांची, चाहत्यांनी अनेकदा माफी मागून देखील त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली होती. त्याचा परिणाम असा की, लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाला. बॉक्स ऑफिसवर त्यानं म्हणावी अशी कमाई काही केली नाही.

लाल सिंग चढ्ढाच्या बाबत जेवढं बोललं गेलं होतं. त्याच्या कमाईच्या आकडयांविषयी सांगितलं गेलं त्यातुलनेत त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. यावेळी आमिरला काही जणांनी हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित करणार का असा प्रश्नही विचारला होता. यावेळी त्यानं आपण किमान सहा ते सात महिन्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते. मात्र आता आमिरनं त्याच्या चाहत्यांना एक वेगळेच सरप्राईज दिले आहे. ते पाहून आमिरच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

आमिरनं कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही अनाऊसमेंट न करता त्याचा चर्चेतील लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित केला आहे. लाल सिंग हा 11 ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर तो नेटफ्लिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एवढ्या लवकर हा चित्रपट ओटीटीवर येईल असे कुणाला वाटले नव्हते. आमिर आणि करिनानं देखील याविषयी कोणतही प्रमोशन केलं नव्हतं.

आमिरनं त्याच्या एका मुलाखतीमध्या आपण किमान सहा महिन्यांच्या कालावधीनंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करु असे सांगितले होते. आता त्यानं आपला निर्णय बदलल्याचे दिसून आले आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर आलेल्या तोट्यामुळे आमिरनं तातडीनं ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT