Laal Singh Chaddha Box Office collection : Takes a VERY POOR start; LOWEST opening for Aamir Khan in the past 13 years  sakal
मनोरंजन

१३ वर्षातील आमीर खानचं सर्वात मोठं अपयश, 'लाल सिंह चड्ढा'ची कमाई निराशाजनक

अभिनेता आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'ला ट्रोलींगचा मोठा फटका बसला आहे.

नीलेश अडसूळ

Laal Singh Chaddha Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित अन् बहु प्रतीक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा बिग बजेट चित्रपट गुरुवरू 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाविषयी आता काही सकारात्मक प्रतिक्रिया देखील आहेत. परंतु या चित्रपटावर बहिष्कार टाकावा म्हणून देखील मोठ्या गटाकडून मागणी होत आहे. पण या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई पाहता आमीरला हे ट्रॉलिंग महागात पडलं असंच दिसतंय..

(Laal Singh Chaddha Box Office collection : Takes a VERY POOR start; LOWEST opening for Aamir Khan in the past 13 years)

आमिर खानचा बहुचर्चित 'लाल सिंग चड्ढा' चार वर्षांच्या कालावधीनंतर रिलीज झाला. करीना आणि आमीर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. हा चित्रपट हीट ठरेल असे बोलले जात होते. मात्र मध्येच या चित्रपटावर जोरदार टीका होऊ लागली. आमीर खानने २०१५ साली केलेले वक्तव्य त्याला भोवले. त्यावेळी 'भारतात राहणे धोक्याचे असून, इथले असहिष्णु लोक भारतातील वातावरण मलीन करत आहेत' असे वक्तव्य केले होते. त्यावरून आता वाद सुरू झाल. आमीर खानच्या देशभक्तीवर प्रश्न उभे करून हा चित्रपट बघू नका अशी मोहीम राबवण्यात आली.

याचाच परिणाम म्हणून की काय आमीरचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०. ७५ कोटींचा गल्ला केला. शिवाय आगाऊ बूकिंगही अत्यंत कमी आहे. जवळपास ३५०० स्क्रीनवर हा चित्रपट झळकला आहे. परंतु आमीर खानच्या चित्रपटांच्या तुलनेत ही कमाई अगदीच कमी म्हणता येईल. एका रीपोर्टच्या नुसार आमीर खानने १३ वर्षात केलेल्या चित्रपटांपैकी हा सर्वाधिक कमी कमाई केलेला हा चित्रपट आहे. पहिल्या दिवशी ६ कोटी रुपये केवळ पीव्हीआर, सिनेपोलिस, आयनॉक्स या चेन मधून प्राप्त झाले. परंतु या आठवड्यात आलेले सुट्ट्यांचे दिवस पाहता कमाईत वाढ होईल असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT