Aamir Khan Google
मनोरंजन

'लाल सिंह चड्ढा' सिनेमा पुन्हा लांबणीवर,प्रदर्शनाची नवीन तारीख आहे...

'आदिपुरुष' सिनेमाला मात्र यामुळे मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा(Aamir Khan) बहुचर्चित सिनेमा 'लाल सिंह चड्ढा'(Lal SIngh Chaddha) याची प्रदर्शनाची तारीख आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. पण यामुळे आमिरच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येत आहे. आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने तारीख बदलल्याची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर यासंदर्भात ट्वीट केलं आहे. यामध्ये सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालेलं नाही त्यामुळे प्रदर्शनाची तारीख बदलत असल्याचं कारण दिलं गेलं आहे.

सिनेमा आता '११ ऑगस्ट २०२२' रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. हा सिनेमा जगभरात १०० ठिकाणी जवळजवळ प्रदर्शित केला जाणार आहे. पण याच दिवशी नेमकं प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार होता. पण या दोन्ही सिनेमाच्या निर्मात्यांनी एकमेकांसोबत बोलल्यानंतर 'आदीपुरुष' सिनेमाची प्रदर्शनाची तारीख बदलणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने केलेल्या ट्वीटमधनं 'आदिपुरुष' च्या टीमचे धन्यवाद मानले आहेत. विशेषतः प्रभास,सैफ अली खान,कृति सेनन यांची नाव नमूद करीत धन्यवाद मानले आहेत. आता प्रभासच्या चाहत्यांच लक्ष लागून राहिलंय ते 'आदिपरुष' सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख काय जाहिर होते याकडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : एलपीजी संकटाने गुजरातमधील स्थलांतरित मजूर बिहारमधील आपल्या गावी परतले

SCROLL FOR NEXT