मनोरंजन

लगानच्या अभिनेत्रीला ब्रेन स्ट्रोक, उपचारासाठी नाहीत पैसे

कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रावर मोठं संकट कोसळल्याचे दिसुन आले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रावर मोठं संकट कोसळल्याचे दिसुन आले आहे. यापूर्वी मनोरंजन क्षेत्रातील कित्येक सेलिब्रेटींनी आपल्याकडील पैसे संपल्याचे सांगून सोशल मीडियावर चाहत्यांना पैशांसाठी आवाहन केलं होतं. त्यात कित्येक नावाजलेल्या सेलिब्रेटींचाही समावेश होता. त्यात काहींना वैद्यकीय उपचारासाठी देखील पैसे नव्हते. आता अशाच एका अभिनेत्रीची गोष्ट समोर आली आहे. त्या अभिनेत्रीनं लगान या प्रसिद्ध चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आता तिच्याकडे त्या आजारावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे दिसून आले आहे. त्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर ही खंत व्यक्त केली आहे.

परवीना बानो (Parveena Bano) या अभिनेत्रीला सध्या मोठ्या संकटातून जावं लागत आहे. तिनं आपल्याला मदतीची गरज असून लोकांना सहकार्य करावं. असं आवाहन केलं आहे. लगानमध्ये परवीनानं केसरियाची भूमिका केली होती. परवीनाला 2011 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्या आजारामध्ये तिचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला. आता तिच्याकडे पुढील उपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे तिची स्थिती गंभीर होत चालली आहे. तिच्याकडील सेव्हिंग देखील संपत चालले आहे. आजतक डॉट इनशी बोलताना परवीनानं सांगितलं की, मी आता माझ्या घरी माझी मुलगी आणि छोट्या बहिणीसोबत राहत आहे. पतीशी वेगळं झाल्यापासून मला कित्येक संकटांना सामोरं जावं लागलं. त्याचा सामना करत मला माझ्या आजारावर इलाज करावा लागला.

मी काही मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या. आणि पैसे कमावले. माझा भाऊ माझी काळजी घेत होता. मात्र आता त्याला देखील कँसर झाला आहे. मला 2011 मध्ये ऑर्थरायटिसचा त्रास झाला. ब्लड प्रेशरही वाढलं. त्यात मला ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे माझी प्रकृती ही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. मी आता घरीच आहे. या आजारपणात माझे बरेच पैसे खर्च झाले आहेत. वेळ अशी आली आहे की, माझ्याकडे पुरेसे पैस देखील नाही. माझी बहिण ही असिस्टंट दिग्दर्शकाचे काम करते. तिचं सगळं घरचं पाहते. लॉकडाऊनमध्ये तिचीही नोकरी गेली. अशावेळी काय करायचं, असा प्रश्न परवीनानं विचारला आहे. अशावेळी तिला अभिनेता सोनू सुदनं मदतीचा हात पुढे केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT