nitish chavan
nitish chavan nitish chavan/instagram
मनोरंजन

'लागिरं झालं जी'च्या आज्याची 'बनवानवी'; पाहा भन्नाट व्हिडीओ

प्रियांका कुलकर्णी

मराठी मालिका 'लागिरं झालं जी'मधील (lagir jhala ji) आज्या आणि शितलीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेमुळे आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाणला (nitish chavan) विशेष लोकप्रियता मिळाली. नितीश सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ नेहमी शेअर करतो. त्याच्या डान्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नितीशने काही दिवसांपूर्वी 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तो व्हिडीओ तेव्हा प्रचंड व्हायरल झाला होता. नुकताच नितीश 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) या चित्रपटातील गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. (lagir jhala ji fame actor nitish chavan share dance video of song Ashi Hi Banwa Banwi)

'अशीही बनवा बनवी' या चित्रपटातील गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर करून नितीशने त्याला कॅप्शन दिले, 'मराठी सिनेसृष्टीतील सगळयांचा आवडता आणि अजरामर चित्रपट 'अशीही बनवा बनवी'. या व्हिडीओमध्ये नितीशची मैत्रिण श्वेता राजन त्याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. श्वेता आणि नितीशची या व्हिडीओमधील केमिस्ट्री नेटकऱ्यांना आवडली आहे.

'अशी ही बनवा बनवी' चित्रपटामध्ये सिद्धार्थ रे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ या दिग्गज कलाकरांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. नितीशच्या या व्हिडीओवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT