Shivani Ghadge 
मनोरंजन

'लागिरं झालं जी'मधल्या अभिनेत्रीची 'देवमाणूस २'मध्ये एण्ट्री

या मालिकेने प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच टीव्हीस्क्रीनला खिळवून ठेवलं.

स्वाती वेमूल

देवमाणूस २ (Devmanus 2) या मालिकेने प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच टीव्हीस्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेचं रंजक कथानक प्रेक्षकांची मनं जिंकतंय. प्रेक्षकांचा या मालिकेला सुरुवातीपासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की नटवर हाच देवमाणूस आहे. आता देवमाणूस परत आला आहे म्हटल्यावर तो नेहमीप्रमाणे आपल्या बोलघेवड्या स्वभावाने स्त्रियांना आपल्या जाळ्यात ओढणार. अशातच त्याला एक सावज भेटलं आहे. गावात आलेल्या कॉट्रॅक्टरची बायको हिच्यावर नटवरची नजर पडली आहे.

प्रोमोमध्ये या व्यक्तिरेखेचा चेहरा न दिसल्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती की ही व्यक्तिरेखा नक्की कोण साकारणार आहे. आगामी भागात प्रेक्षकांना तो चेहरा पाहायला मिळणार आहे. ही भूमिका अभिनेत्री शिवानी घाडगे साकारतेय. शिवानी हिला प्रेक्षकांनी याआधी लगीर झालं जी या मालिकेत सुमन काकीच्या भूमिकेत पाहिलं होतं. आता या नव्या भूमिकेत शिवानीला पाहताना प्रेक्षकांना सुखद धक्का मिळणार आहे.

या नवीन भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, "मी देवमाणूस २ मध्ये गावात आलेल्या कॉन्ट्रॅक्टरची बायको नीलमची भूमिका साकारतेय. याआधी मी लागीर झालं जी मध्ये सुमन काकीची भूमिका साकारली होती. नीलम ही भूमिका सुमनच्या अगदी विरुद्ध आहे. सुमन ही अगदी साधी भोळी आहे, याउलट नीलम ही गावातील सगळ्यात जास्त मादक स्त्री आहे. डॉक्टर देवची नजर ज्या स्त्रीवर पडते त्यांचं काय होतं हे प्रेक्षकांनी पाहिलंच आहे. त्यामुळे आता निलमचं काय होणार, नीलम डॉक्टरच्या जाळ्यात अडकणार का, हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल." देवमाणूस २ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT